कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी घातली आहे. कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने काळजीपोटी कोण-कोणाकडे जात नाही अथवा येतही नाही. याचे सर्वाधिक दु:ख हे माहेरवाशीण मुलीला आणि तिच्या आईला अधिक आहे. त्यांना एकमेकींना भेटताच आलेले नाही. मुलीला आईच्या खाद्यांवर डोक ठेवून मायेची ऊब घेता आलेली नाही की, आईला आपल्या मुलीच्या पाठीवर हात फिरवून संसाराची विचारपूस करता आलेली नाही. त्यामुळ दोन्हीकडे भेटण्याची प्रचंढ ओढ लागली आहे. मात्र कोरोनामुळे त्यांचे स्वप्न साकार होऊ शकत नाही. शाळा जरी बंद असल्या तरी मामाच्या गावाला जाऊन धम्माल करण्याच्या संधीही कोरोनाने लहान मुलांकडून हिरावली आहे. त्यामुळे त्यांचाही हिरमोड होताना दिसून येत आहे.
बॉक्स
माझ माहेर माहेर...
मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून आई-वडिलांकडे (माहेरी) जाता आले नाही. त्यामुळे आई-बाबांची केव्हा भेट घेईन असे झाले आहे. केवळ मोबाइलद्धारे संवाद साधून हालचाल विचारण्यात येत आहे.
अनुपाली खोब्रागडे, चंद्रपूर
-------
माझे माहेर आणि सासर एकाच जिल्ह्यात आहे. केवळ एक तासाचे अंतर आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे बसफेऱ्या बंद, कोरोनाची दहशत यामुळे दोन वर्षांपासून माहेरी गेली नाही. दरवर्षी रक्षाबंधनाला नक्कीच गावाला जायची. मात्र मागील वर्षी तेव्हाही जाता आले नाही.
- प्रतिमा कोडापे, चंद्रपूर
----
आमच्या नातेवाइकांपैकी अनेकांचे यंदा लग्न ठरले होते. त्यामुळे माहेरी जाण्यास बऱ्याच संधी होत्या. त्यामुळे उत्साह होता. मात्र कोरोनामुळे लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे माहेरी जाण्याची संधीच कोरोनाने हिरावली आहे.
-संघू खैरे, चंद्रपूर
-------
बॉक्स
लागली लेकीची ओढ
सणासुदीला लेक दरवर्षी घरी यायची. नातवंडामुळे घर भरून जायचे. कसे दिवस जायचे कळायचे नाही. लेकीसह नातवंडाची ओढ लागली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या संपत आल्या तरी नातवंडे घरी येऊ शकले नाही. केवळ मोबाइलवरच नातवंडांची खुशाली विचारण्यात येत आहे.
-शांताबाई दुधकोर, चंद्रपूर
----
कोरोनामुळे घरी पाहुणेपरी येणे बंदच झाले आहे. दरवर्षी आमची पोर आपल्या मुलाला घेऊन दिवाळी, दसरा, होळी आदी सण साजरे करायला. घरी यायची. मात्र मागील वर्षींपासून घरी येणे बंदच झाले आहे.
-लता शेंडे, चंद्रपूर
-------
नातवंडासह मुलगी घरी आली की, घराला घरपण येते. गप्पा गोष्टीत दिवस कसे भुर्रकन उडून जातात, हे कळत नाही, मात्र कोरोनाने हे सुख हिरावले आहे. आता कधी नातवंडांची व मुलीची भेट होते माहिती नाही. व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधण्यात येत आहे.
शांता रामटेके, चंद्रपूर
-------
मामाच्या गावला कधी जायला मिळणार
कोट
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच मामाच्या गावाला जात होतो. ट्रेनने मामाच्या गावला जायची मजा काही औरच असायची. मात्र आता मम्मी ट्रेन बंद आहे, कोरोनाने घराबाहेर जायचे नाही, असे नेहमी ओरडत असते.
-लैकिक काकडे, चंद्रपूर
मामाच्या गावाला खूप मज्जा करायचो. मामी वेगवेगळे पदार्थ बनवून घायला घालायची. मात्र मागील वर्षीपासून आई मामाच्या गावाला घेऊनच गेली नाही. मामा आणि मामीसुद्धा घरी आले नाही.
नन्ही मेश्राम, चंद्रपूर
्----
मामाचे गाव म्हणजे हक्काचे घर मस्त खायचे आणि खेळायचे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्यात मामाच्या गावाला जात होतो. मात्र कोरोनाने आता गावाला जाणे बंदच झाले आहे. सर्व सुरळीत झाल्यानंतर मामाच्या गावला नक्कीच जाईल.
-सुयोग वासाडे, चंद्रपूर
----