शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

बापरे..! बिबट जाऊन बसला झोपलेल्या महिलेच्या खाटेखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2022 8:12 PM

Chandrapur News रात्रीच्या वेळी घरात शिरून महिला झोपलेल्या खाटेखाली बिबटाने ठाण मांडले. पहाटेच्या सुमारास ही बाब लक्षात येताच घरातील सदस्यांनी राखले प्रसंगावधान.

ठळक मुद्देरात्रभर बिबट्याचे उसेगाव येथील घरातच ठाण

चंद्रपूरः सावली तालुक्यातील उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट शिरला. भगवानची आई पहाटेच्या सुमारास उठली असता, तिला तिच्या खाटेखाली चक्क बिबट बसलेला दिसला. यामुळे घरातील मंडळी भयभीत झाली. प्रसंगावधान साधून घरातील सर्व मंडळी घराबाहेर आली व बाहेरून दरवाजा बंद केला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने अथक परिश्रमानंतर गुरुवारी सकाळी ८ वाजता बिबट्याला जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सावलीपासून सात किमी अंतरावर असलेल्या उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात बुधवारी रात्री बिबट शिरला. पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भगवानची आई सिंधूबाई लघुशंकेसाठी उठली असताना खाटेच्या खाली काहीतरी असल्याची जाणीव झाली. डोकावून बघितले असता बिबट्याला पाहून तिची भंबेरी उडाली. दरम्यान, या बिबट्याने सून शशिकलाबाई हिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून शशिकला घराबाहेर पडली आणि घराचे दार बाहेरून बंद केले.

तोपर्यंत घरातील संपूर्ण सदस्य बाहेर पडले होते. ही घटना गावात पसरताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. वनविभागाच्या चमूने घटनास्थळ गाठून सकाळी ८ वाजताच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले. यावेळी वनविभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत खाडे, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी, ठाणेदार आशिष बोरकर, ईको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे उपस्थित होते. सदर बिबट हा अडीच ते तीन वर्षे वयाचा असून, शेळ्या आणि कोंबड्यांवर ताव मारण्याच्या हेतूने तो गावात येत होता. मात्र मध्य वस्तीत शिरून शिकार करण्याच्या नादात तो घरात शिरला. यामुळे गावकरी अजूनही भयभीतच आहेत.

टॅग्स :leopardबिबट्या