लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छतेकरिता अभिनव उपक्रम म्हणून ‘माझं गावच माझ तिर्थ’ स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी राबविली जात आहे. या स्पर्धेतून गावाला विकासाकडे नेण्यासाठी हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.जिल्ह्यातील गावागावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संकल्पना दृढ व्हावी व जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम शाश्वत स्वच्छ राहावे, या दृष्टीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविल्या जात आहे. माझं गावच माझं तिर्थ नामक हा उपक्रम मोठ्या स्वरुपात राबविणारा चंद्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा ठरणार आहे. या स्पर्धेची सुरुवात चंद्रपूर तालुक्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र वढा येथून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व गावात शाश्वत स्वच्छतेकरिता श्रमदान, लोकसहभागाची चालना देण्याचे काम केले जात आहे. या स्पर्धेत लोकसहभावर भर देण्यात आला असून स्पर्धेत तालुकास्तर व जिल्हा स्तरावर भरघोष बक्षीस स्पर्धेत उत्कृष्ठ काम करणाऱ्या गावाला दिले जाणार आहे.१६ नोव्हेंबर २०१८ पासून जिल्ह्यात स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेच्या तपासणीकरिता तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती व जिल्हास्तरीय तपासणीकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. तालुकास्तरीय तपासणी १ जानेवारी २०१९ ते १० जानेवारी २०१९ या कालावधीत तर जिल्हास्तरीय तपासणी १५ जानेवारी २०१९ ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार आहे. गाव तपासणी करताना तपासणी चमू नादुरुस्त शौचालय दुरुस्ती व वापर, वाढीव कुटुंबाकडे शौचालय उपलब्धता व वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाययोजना, शोषखड्डे, प्लॅस्टिक निर्मुलन, विद्यार्थ्यांमध्ये जागृती, सार्वजनिक स्थळांची स्वच्छता व गावात शाश्वत स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने गावकºयांनी लोकसहभागातून राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबींवर भर दिला जाणार आहे.जिल्ह्यातील गावे या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असून शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण होण्यासाठी ग्रामस्थ सहभागी होऊन प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय यंत्रणा व तालुकास्तरीय यत्रंणा स्पर्धेची माहिती गावागावात देत आहेत.अशी आहेत बक्षिसेतालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला अनुक्रमे रुपये २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपयांचे रोख बक्षीस व सन्मानपत्र तर जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाºया ग्रामपंचायतीला अनुक्रमे एक लाख, ७५ हजार व ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस व सन्मानपत्र देवून ग्रामपंचायतींना गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विशेष बाब म्हणून नाविण्यपूर्ण प्रोत्साहन म्हणून ४० हजार रुपये रोख व सन्मानपत्र या स्वरुपाचे चौथे बक्षीस आहे.‘माझं गावच माझ तिर्थ’ ही एक अभिनव संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडली आहे. हीच ग्रामविकासाची संकल्पना जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम शाश्वत स्वच्छ करुन गावागावात ग्रामस्थांमध्ये रुजायला हवी. यासाठी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी या स्पर्धेकरिता लोकसहभाग व श्रमदानातून गावाला सज्ज करावे.- जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर.
शाश्वत स्वच्छतेसाठी ‘माझं गावच माझं तीर्थ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 10:27 PM
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छतेकरिता अभिनव उपक्रम म्हणून ‘माझं गावच माझ तिर्थ’ स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी राबविली जात आहे. या स्पर्धेतून गावाला विकासाकडे नेण्यासाठी हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
ठळक मुद्देप्रत्येक गाव होणार सहभागी : जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम