चंद्रपूर : कोरोनाने सर्वत्र दहशत माजवली असतानाच आता म्युकरमायकोसिस आजारानेही तोंड वर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५८ जणांना हा आजार जडला असून, २६ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. मात्र, लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन उपचार घेणे गरजेचे आहे. म्युकरमायकोसिस नावाची काळी बुरशी जमिनीवर अधिक तर हवेत कमी प्रमाणात आढळते. ती प्रामुख्याने नाकावाटे श्वसनमार्गाने शरीरात प्रवेश करते. रोगप्रतिकारशक्ती कमी आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या शरीरात ही बुरशी सहज प्रवेश करून एकेक टप्पा ओलांडत रुग्णांना धोकादायक अवस्थेत पोहोचवते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून मधुमेह नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. मात्र, म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांसह आरोग्य विभागाचाही ताण वाढला आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. मात्र, प्रचंड खर्चीक आहे. त्यामुळे वेळीच उपचार घेऊन यावर नियंत्रण आणता येत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बाॅक्स५८
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण रुग्ण ०१
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू
बाॅक्स
म्युकरमायकोसिस आजारासंबंधी आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. हा आजार संसर्गातून होत नाही.
बाॅक्स
म्युकरमायकोसिससाठी औषधींचा साठा पुरेसा
म्युकरमायकोसिस आजार झालेल्या रुग्णांवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्राइस्ट रुग्णालय तसेच वासाडे हाॅस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. सद्यस्थितीत औषधसाठा पुरेसा असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आजपर्यंत ५८ रुग्ण आढळले असून, यातील २६ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
बाॅक्स
धोका टाळता येतो.
म्युकरमायकोसिस हा एक अतिजलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो. कोरोना आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये आढळतो, तसेच ज्या रुग्णांना मधुमेह आहे, अशा रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. हा विषाणू साधारणपणे नाकाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींनी सहा आठवड्यांपर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
बाॅक्स
म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे
चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे, अर्धशिशी (डोक्याची एक बाजू दुखणे)
नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, एका नाकपुडीतून रक्तस्राव, काळपट स्राव
चेहरा अथवा डोळ्यांवर सूज, एक पापणी अर्धी बंद राहणे, डोळा दुखणे
वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप
बाॅक्स
ही घ्या काळजी
रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे, कान, नाक, घसा, नेत्र व दंतरोग तज्ज्ञांकडून एका आठवड्यानंतर तपासणी करावी, लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा, डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टेरॉइड घेऊ नये, टूथब्रश, मास्क वरचेवर बदलणे, दिवसातून एकदा गुळण्या करणे, वैयक्तिक व परिसरातील स्वच्छता ठेवणे, जमिनीखाली लागणाऱ्या भाज्या नीट स्वच्छ धुऊन खाव्यात, मातीत काम करताना व खतांचा वापर करताना पूर्ण बाहीचा शर्ट, फुलपॅट, हातात ग्लोव्हज घालावे व नाका-तोंडावर मास्क घालावा.
बाॅक्स
डाॅक्टर काय म्हणतात... कोरोना लाटेनंतर आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, वेळीच उपचार केल्यास रुग्ण बरा होतो. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. लक्षणे दिसताच रुग्णांनी त्वरित डाॅक्टरांसोबत संपर्क साधावा.
-डाॅ. अविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी, मनपा चंद्रपूर
-कोट
हा आजार कोरोना होऊन गेलेल्यांमध्ये अधिक प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देण्यासोबतच वैयक्तिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. हा बुरशीचा प्रकार आहे. नाकामध्ये होतो. त्यानंतर डोळ्यांपर्यंत आणि शेवटी मेंदूपर्यंत पोहोचतो. रुग्णांनी वेळीच काळजी घेऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डाॅ. सौरभ राजूरकर, छातीरोग तज्ज्ञ, चंद्रपूर
कोट
नाक, डोळे, घसा आणि शेवटी मेंदूपर्यंत हा आजार हल्ला चढवितो. हे सर्व अवयव अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे आजार वाढल्यास शस्त्रक्रिया देखील करण्याची गरज पडते. रुग्णांना न घाबरता वेळीच औषधोपचार घ्यावा. प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
-डाॅ. वर्षा गट्टानी, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी,
शासकीय महाविद्यालय, चंद्रपूर
कोट
शुगर असलेल्या रुग्णांना हा आजार इतरांच्या तुलनेमध्ये होण्याची अधिक शक्यता असते. या आजारातून बचावाकरिता तोंड, नाक, दात स्वच्छ ठेवावे. संतुलित आहार, व्यायाम आदी गोष्टींकडेही लक्ष द्यावे.
-डाॅ. आकाश कासटवार
नोडल अधिकारी (म्युकरमायकोसिस) जिल्हा रुग्णालय