शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नाफेडची तूर खरेदी संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:20 PM

नाफेडद्वारा वरोरा येथे तूर खरेदी फक्त एका काट्याद्वारे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असून तूर खरेदीची गती वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची जलदगतीने तूर खरेदी करावी....

ठळक मुद्देकाँग्रेस शिष्टमंडळाची मागणी : चणा खरेदी सुरू करा

आॅनलाईन लोकमतवरोरा : नाफेडद्वारा वरोरा येथे तूर खरेदी फक्त एका काट्याद्वारे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असून तूर खरेदीची गती वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची जलदगतीने तूर खरेदी करावी तसेच नाफेडद्वारे चणा खरेदी सुरू करावा, अशी मागणी काँग्रेस नेते डॉ. विजय देवतळे यांनी नाफेडचे अधिकारी व तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी मार्केट यार्डला भेट दिली. तेव्हा शेतकऱ्यांना सोबत घेवून तूर खरेदी संदर्भात नाफेड व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. नाफेड मार्फत तूर खरेदी सुरू झाली असून आजपर्यंत १३०० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. महिन्याभरात केवळ १५० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली असून सध्या बाजारात तुरीचे भाव फारच कमी असल्यामुळे शेतकºयांत निराशा आहे. त्यातच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकच वजन काटा असून हमालाची संख्याही फारच कमी असल्याने दरदिवशी अत्यल्प तूर खरेदी केली जात आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली त्यांचे चुकारे अद्यापही बँक खात्यात जमा झालेले नाही.मार्च महिन्याच्या शेवटी सोसायटी व बँकेचे कर्ज परतफेड करावे लागणार असल्याने शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे तत्काळ चुकारे अदा करून खरेदीची गती वाढवावी, चणा खरेदी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना नगराध्यक्ष विलास टिपले, मिलिंद भोयर, कन्हैयालाल जैस्वाल, दुर्गा ठाकरे, गिरीधर कष्टी, गुणवंत भोयर, वसंत विधाते आदी उपस्थित होते.