घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ५६ शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत.सर्व शेतकरी सभासदांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन कसोशीचे प्रयत्न करीत असले तरी शेतकरी सभासदांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने वर्षभरानंतरही तालुक्यात ५६ शेतकरी सभासदांची कर्जप्रकरणे प्रलंबित आहेत. या सभासदांनी किंवा सभासदांच्या वारसांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली तर या सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास कोणतीही अडचण नाही, अशी सुत्राची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार नागभीड यांच्याकडे एकूण १९ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागभीड शाखेतील एक, तळोधी शाखेत १०, पाहार्णी दोन, नवेगाव पांडव शाखेत एक तर स्टेट बँक तळोधी शाखेतील पाच प्रकरणांचा यात समावेश आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडे ३७ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. प्रलंबित असलेल्या या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागभीड, नवेगाव पांडव, पाहार्णी, शाखेतील प्रत्येकी एक तर तळोधी शाखेतील दोन प्रकरणांचा समावेश आहे. स्टेट बँकेच्या तळोधी शाखेतील २६, वाढोणा शाखेतील एक तर बाळापूर शाखेत तीन प्रकरणांचा समावेश आहे. ग्रामीण बँकेच्या तळोधी आणि मोहाळी येथीलही प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे.
५ हजार ३७५ शेतकऱ्यांना लाभनागभीड तालुक्यात सहा हजार ३० शेतकºयांचे खाते अपलोड करण्यात आले होते. त्यापैकी पाच हजार ३७५ शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला असून रक्कम २२ कोटी ३ लाख रुपये आहे.
जे कर्जदार सभासद मय्यत आहेत, पण कर्जमुक्तीसाठी पात्र आहेत. त्या सभासदांच्या वारसांनी सभासदाचा मृत्यू दाखला,आधार कार्ड, वारसान प्रमाणपत्र, वारसानाचे आधार कार्ड व बँक पासबूक आदी कागदपत्रासह सहायक निबंधक कार्यालयाशी संपर्क करावा.- पी. एन. गौरकार, सहकार अधिकारी.