शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नागभीड तालुक्यात ३२ गावे अजूनही कोरोनामुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:35 AM

नागभीड : सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना नागभीड तालुक्यात ३२ गावांनी कोरोनास आतापर्यंत गावाच्या वेशीवरच रोखून धरले आहे. १६ ...

नागभीड : सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना नागभीड तालुक्यात ३२ गावांनी कोरोनास आतापर्यंत गावाच्या वेशीवरच रोखून धरले आहे. १६ एप्रिलच्या आकडेवारीनुसार तालुक्यात ३२ गावे अद्यापही कोरोनामुक्त आहेत.

मागील वर्षीच्या २३ मार्चपासून तालुक्यात कोरोनाविरुद्ध लढा सुरू झाला. तब्बल दोन महिने या तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला नव्हता; मात्र ३ जून रोजी नागभीड व तालुक्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कोरोनाचे सत्रच सुरू झाले. बहुतेक गावात कोरोनाचे रुग्ण मिळू लागले. अशाही परिस्थितीत तालुक्यातील ३२ गावे अद्यापही कोरोनामुक्त आहेत.

नागभीड तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व एक ग्रामीण रुग्णालय असून, गावांची एकूण संख्या ११० आहे. या सहाही वैद्यकीय प्रतिष्ठानांकडून सर्वत्र कोरोनाबद्दल जागृती सुरू आहे ; मात्र कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशाही परिस्थितीत तालुक्यातील ३२ गावे कोरोनापासून दूर आहेत, ही तालुक्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.

बॉक्स

या गावात कोरोना नाही

मिळालेल्या माहितीनुसार, नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहा गावात कोरोनाने अद्याप प्रवेश केला नाही. त्यात तिव्हर्ला, चिचोली, रेंगातूर, कोरंबी, कसर्ला, कोथुळणा, कुनघाडा या गावांचा समावेश आहे.

मौशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक गाव कोरोनामुक्त आहे. यात टेकरी या गावाचा समावेश आहे. बाळापूर प्राथमिक केंद्रातील आठ गावांनी कोरोनास गावाच्या वेशीवरच रोखून धरले आहे. त्यात येनोली, राजुली, नवानगर, पारडी, सोनुली, कोसंबी गवळी, गोवारपेठ, वासाळा मेंढा ही ती गावे आहेत. वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रातीलही ८ गावे कोरोनापासून दूर आहेत. या गावांमध्ये सोनापूर तुकूम, सावर्ला, मेंढा चारगाव, सोनुली, झाडबोरी,आवलगाव,खरकाडा व हस्तिनापूर या गावांचा समावेश आहे. तळोधी ( बाळापूर) प्राथमिक आरोग्य केंद्रातील घोडाझरी, कचेपार, धामणगाव माल, सोनापूर, सारंगड, खरबी, सोनुर्ली, सावंगी, कोजबी चक, चारगाव माना या गावांचा समावेश आहे.