आॅनलाईन लोकमतनागभीड : येथील ग्रामीण रूग्णालय पुरेशा वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीअभावी स्वत:च कुपोषित झाले आहे. शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून हे कुपोषण दूर करावे, अशी मागणी आहे.या ग्रामीण रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधिक्षक तर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. पण सध्या डॉ.समीर नागदेवते हे एकच डॉक्टर या ग्रामीण रूग्णालयाचा भार वाहत आहेत. अशीच अवस्था आयुष विभागाची आहे. येथेही तीन डॉक्टरांच्या पोस्टींग असल्या तरी आयुष विभागातही एकच डॉक्टर सेवा देत असल्याची माहिती आहे. याशिवाय परिचारिकांचे दोन तर औषधी निर्मात्याचे एक पद रिक्त आहे. या ठिकाणी एकच डॉक्टर कार्यरत असल्याने याच डॉक्टरला बाह्य रूग्ण तपासून शवविच्छेदन व आरोपींची तपासणी करावी लागत आहे. याशिवाय विविध शिबिरेसुद्धा याच डॉक्टरांना सांभाळावी लागतात. नाईलाजाने रुग्णांना नागपूर किंवा चंद्रपूरला रेफर करावे लागते.महिला डॉक्टरांची नियुक्ती करावीया ग्रामीण रूग्णालयात महिला डॉक्टरांची नियुक्ती करावी, ही फार जुनी मागणी असली तरी या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.या ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावी, यासाठी माझा अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे नियोजन सुरू आहे.- मो.जहांगीर कुरेशी, माजी सरपंच नागभीड
नागभीडचे ग्रामीण रूग्णालय कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:42 PM