लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : पिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा व शेतकरी राजा सुखी समृद्ध व्हावा, या हेतूने शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजवा कालव्याद्वारे शेकडो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा केला जाते. परंतु, कंत्राटदाराने उजव्या कालव्याद्वारे छोट्या कालव्यांना पाणी निचरा होणाऱ्या पाईपलाईनचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे कालव्याच्या पाळीला मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके करपत असलेले चित्र ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द येथे बघायला मिळत आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात सद्या शेतीचा हंगाम जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात धान पिकांची लागवड केली आहे. पिकासाठी पाणी सोडल्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल, अशा आशेत बळीराजा होता. मात्र उजव्या कालव्याद्वारे छोट्या कालव्यांना पाणी निचरा होणाºया पाईपलाईनचे काम करताना कंत्राटदाराने सिमेंट काँक्रीटचा वापर न करता केवळ मुरूम टाकून काम पूर्णत्वास नेले. त्यामुळे पावसाच्या पाण्याने उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवरील मुरुम खचल्याने पाळीला मोठे भगदाड पडले आहे.उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवरील मुरुम पाईपलाईनमध्ये गेल्यामुळे शेतीला छोट्या कालव्यामार्फत होणाºया पाण्याचा प्रवाह पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे भात पीक करपत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बी-बियाणांचा खर्च डोळ्या देखत वाया जात आहे. शेतकरी हवालदिल झाला असून कर्जाच्या खाईत जाणार असल्याचे चित्र सद्या स्थितीवरुन दिसत आहे.नहराच्या पाळीला मोठे भगदाड पडल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देऊन छोट्या कालव्याद्वारे बंद झालेला पाणी पुरवठा त्वरीत सुरू करण्यात यावा अशी मागणी तोरगाव खुर्द येथील शेतकरी विनय पारधी, श्रीकृष्ण पारधी, नामदेव बुल्ले, जयघोष बुल्ले, मधुकर बुल्ले, गुलाब बनकर, आत्माराम बुल्ले, करबा सुखदेवे, गुरुदेव पारधी, प्रकाश बावनकुळे यांनी केली आहे.
नहराला भगदाड, पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:38 PM
पिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा व शेतकरी राजा सुखी समृद्ध व्हावा, या हेतूने शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजवा कालव्याद्वारे शेकडो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा केला जाते. परंतु, कंत्राटदाराने उजव्या कालव्याद्वारे छोट्या कालव्यांना पाणी निचरा होणाऱ्या पाईपलाईनचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे कालव्याच्या पाळीला मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके करपत असलेले चित्र ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द येथे बघायला मिळत आहे.
ठळक मुद्देपिके करपली : गोसेखुर्दच्या छोट्या कालव्यांची स्थिती