यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे, पर्यावरण विभागप्रमुख नितीन रामटेके व पालिका उद्यान निरीक्षक अनुप ताटेवार उपस्थित होते. या अभियानात पठाणपुरा गेट लगतचे तर पाणी टाकी लगतच्या वृक्षांचे खिळे, फलक काढण्यात आले. यावेळी इको-प्रो चे धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, अनिल अडगुरवार, राजेश व्यास, सुधीर देव, अब्दुल जावेद, अमोल उटटलवार, सचिन धोतरे, जयेश बैनलवार, अभय अमृतकर सहभागी होते. शहरात अनेक ठिकाणी हेरिटेज वृक्ष दिसून येतात, या वृक्षांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही पालिका किंवा पर्यावरण संस्थेची नसून प्रत्येक व्यक्तीची आहे. वृक्ष तोड होत असल्यास प्रत्येक नागरिकांनी यात हस्तक्षेप करीत तक्रार करण्याची गरज आहे. शहरातील विकासकामांदरम्यान वृक्ष वाचविणे, घराचे बांधकाम करतानासुद्धा वृक्ष वाचविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. शहरात विविध कारणांसाठी वृक्षांना खिळे ठोकले जात असल्याने झाडांना इजा पोहोचविली जाते. याकरिता परिसरातील वृक्षांना खिळे ठोकू न देणे, तसेच खिळेमुक्त वृक्ष करण्यास प्रत्येकांनी पुढाकार घेत या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन इको-प्रो संस्थेने केले.
बॉक्स
देऊ वृक्षांना मोकळा श्वास
शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत, यात सिमेंट क्राँकीट रस्त्याच्या बांधकामाचे प्रचलन वाढले आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांचा श्वास कोंडतो. कुठलेही बांधकाम करताना वृक्षांना ‘आडे’ ठेवणे किंवा वृक्ष लावण्यास जागा ठेवून आडे करण्याची गरज आहे. इको-प्रोने स्वातंत्र्यदिनी ही माेहीम सुरू केली. आडेयुक्त वृक्ष आणि देऊ वृक्षांना मोकळा श्वास असे या अभियानाचे सूत्र आहे.