भाजपची राहुल गांधी यांच्या भेटकर्त्यांच्या यादीला कात्री; विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:16 PM2018-06-13T12:16:34+5:302018-06-13T12:16:34+5:30

नांदेड येथे येत असलेल्या भा. रा. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी एकूण ६० जणांची यादी एसपीजीला देण्यात आली होती.

In the name of security, BJP cut down visitors list of Rahul Gandhi's list of friends, The allegations of Vijay Vadeettwar | भाजपची राहुल गांधी यांच्या भेटकर्त्यांच्या यादीला कात्री; विजय वडेट्टीवार

भाजपची राहुल गांधी यांच्या भेटकर्त्यांच्या यादीला कात्री; विजय वडेट्टीवार

Next
ठळक मुद्देएसपीजीला दिली होती ६० नावांची यादीयशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने नरेश पुगलिया यांना मिळाला प्रवेश


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: नांदेड येथे येत असलेल्या भा. रा. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी एकूण ६० जणांची यादी एसपीजीला देण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या नावाखाली फक्त २२ जणांचीच यादी मंजूर झाल्याचे षडयंत्र भाजपाने सुरक्षेच्या नावावर रचल्याचा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
नांदेड येथे सकाळपासून येत असलेल्या काँग्रेस नेत्यांपैकी काहींना मुख्य कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळाला नसल्याचे वृत्त आहे. चंद्रपूरचे नगरसेवक अशोक नागपुरे यांनी माजी खासदार नरेश पुगलिया व राहुल पुगलिया यांच्या ओळखपत्रासाठी बरीच धडपड केली. अखेरीस राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने पुगलिया यांना प्रवेश मिळाला.

काँग्रेस नेत्यांचे आगमन

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी खासदार नाना पटोले यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Web Title: In the name of security, BJP cut down visitors list of Rahul Gandhi's list of friends, The allegations of Vijay Vadeettwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.