आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतरही मराठीत बोर्ड न लावणाºया दुकानदारांविरोधात मनसेने रविवारी खळखट्याक आक्रमक आंदोलन करीत इंग्रजी बोर्ड मनसे कार्यकर्त्यांनी खाली उतरविले. येत्या काळात मराठी बोर्ड नसणाऱ्या दुकानांविरोधातही अशाच प्रकारे आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहरध्यक्ष मनदिप रोडे यांनी दिला आहे.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्टÑातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्या, असा कायदा असताना याचे पालन कुणी करीत नाही. या विरोधात मनसे आंदोलन उभारणार असा इशारा दिला होता. महाराष्टÑात मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे, मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिज, सर्व सामान्य जनतेला दुकानाच्या पाट्या समजल्या पाहिजे यासाठी मनसेची ही आग्रही भूमिका आहे.यापूर्वी मनसेने चंद्रपुरातील व्यापारी, कार्यालयांना मराठी पाट्यांबाबत इशारा दिला होता. यानुसार रविवारी तुकूम तसेच नागपूर मार्गावर दुकानावरील इंग्रजी बोर्ड उतरविले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी भाषेची अस्मिता जपलीच पाहिजे, अशी नारेबाजी केली. चंद्रपुरातील व्यापारी, कार्यालयांनी दुकानांच्या पाट्या, फलक येत्या काळात मराठी भाषेत न केल्यास त्यांच्या विरोधातही अशाच प्रकारे खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.या आंदोलनात शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, राहुल चव्हाण, व्यंकटेश मुक्तलवार, आशिष उराडे, राजा मेहता, तिरुपती गड्डमवार, प्रदीप इटनकर, कपील डंबारे, रोहन मुकेश, गौरी, राहुल मंडल, सन्नी मंडल, राजेश सुल्तान आदी मनसे कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
मनसेने उतरविल्या इंग्रजी नावाच्या पाट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:46 PM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतरही मराठीत बोर्ड न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मनसेने रविवारी खळखट्याक आक्रमक आंदोलन करीत इंग्रजी बोर्ड मनसे कार्यकर्त्यांनी खाली उतरविले.
ठळक मुद्देखळखट्याक आंदोलन : दुकानदारांना सात दिवसांचा अल्टीमेटम्