शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासयुगाला प्रारंभ

By admin | Published: September 18, 2016 12:51 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ विकासपुरूष नसून खऱ्या अर्थाने युगपुरूष आहेत.

सुधीर मुनगंटीवार : पंतप्रधानांच्या भाषण संग्रहाचा प्रकाशन सोहळाचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ विकासपुरूष नसून खऱ्या अर्थाने युगपुरूष आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतात खऱ्या अर्थाने विकासाच्या युगाला प्रारंभ झाला आहे. त्यांनी आपल्या कामातून युवा पिढीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. दिलेल्या शब्दाला योग्य कृतीची जोड देऊन विश्वास निर्माण करत जागतिक स्तरावर भारताचा सन्मान राखणाऱ्या या नेत्याच्या स्फुर्तीदायी भाषणांचा बहुमुल्य ठेवा पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे, याचा आनंद आहे, असे प्रतिपादन वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पुणे येथे प्रकाशित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४२ भाषणांचा संग्रह ‘सबका साथ सबका विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार आदींची उपस्थिती होती. यावेळी पुणेचे उल्हास लाटकर यांनी प्रास्ताविक केले व पुस्तकाविषयीची भूमिका विशद केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचा हा संग्रह त्यांच्याच कार्यपध्दतीला अनुसरून काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष नेत्याच्या हस्ते प्रकाशित होणे हा सुर्वणकांचन योग असल्याचे उल्हास लाटकर यावेळी बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद अजय कौटीकवार व अमित मोडक यांनी केला असून या प्रकाशन समारंभात अजय कौटीकवार यांचा सत्कार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)