लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून अनेक बंदीबांधव निष्णात कारागीर झाले आहेत. बांबूपासून विविध वस्तू ते तयार करीत असून त्यांनी तयार केलेले राष्ट्रध्वज हस्तकलेचे उत्तम आकर्षण ठरत आहे.कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या परवानगीने बंदी बांधवांसाठी येथील जिल्हा कारागृहात बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांच्या अध्यक्षतेखाली व बांबू संशोधन केंद्राचे संचालक राहुल पाटील, हॅन्डीक्राफ्ट सुपरवायजर योगिता साठवणे, हॅन्डीक्राफ्ट सुपरवायजर किशोर गायकवाड व सुरेश चुग, अकबर शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीकडून बंदीबांधवांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. कारागृहातून मुक्त झाल्यावर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोनातून बांबूपासून निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्तु बनविण्याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यातून प्रशिक्षित झालेल्या १७ पुरूष कैदीबांधव व १० महिला हे कारागृहात बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तु तयार करीत आहे. कारागृह प्रशासनाच्या वतीने व बीआरटीसीच्या वतीने बंदीवानांनी बांबूपासून तयार केलेले राष्ट्रध्वज हे अत्यंत लक्षवेधी ठरत आहे.बांबूपासून तयार होणाऱ्या या हस्तकलेच्या विविध वस्तूंमधून बंदीवानांना कारागृहात रोजगार प्राप्त झाले असून कारागृहात शिक्षा भोगून सुटल्यानंतर ते स्वत:चा उदरनिर्वाह करू शकेल, एवढे कौशल्य त्यांनी या बांबू प्रशिक्षणातून हस्तगत केलेले आहे. बंदी पुनर्वसनाच्या दृष्टीने कारागृह प्रशासन व बीआरटीसी यांनी घेतलेले हे सकारात्मक पाऊल असून बंदीवानांनी या उपक्रमाचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आहे. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांच्या नेतृत्वात वरिष्ठ तुरूंगाधिकारी वैभव आत्राम, तुरूंगाधिकारी विठ्ठल पवार, सुभेदार, अशोक मोटघरे, देवाजी फलके, शिपाई गौरव पाचाडे, रिकू गौर, पदमाकर मेश्राम, लवकुश चव्हाण, नितीन खोब्रागडे परिश्रम घेत आहेत.
कारागृहातील बंदी करताहेत राष्ट्रध्वजाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:12 AM
येथील जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून अनेक बंदीबांधव निष्णात कारागीर झाले आहेत. बांबूपासून विविध वस्तू ते तयार करीत असून त्यांनी तयार केलेले राष्ट्रध्वज हस्तकलेचे उत्तम आकर्षण ठरत आहे.
ठळक मुद्देजिल्हा कारागृहाचा स्तुत्य उपक्रम : शिक्षा भोेगणाऱ्यांनाही रोजगाराची संधी