नागरिकांना पत्रकाचे वितरण : वाहतुक नियंत्रक व चिमूर पोलिसांचा सहभागचिमूर : रस्ते अपघातात होणारी जीवित व वित्तहानी यापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक नियंत्रक चंद्रपूर यांच्या वतीने २८ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान २०१७ अंतर्गत चिमूर शहरातील वाहतूक परवाना शिबिरात नागरिक, विद्यार्थी व पत्रकारांना जागृतीपर पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. यावेळी चिमूर पोलीस विभागाचा सहभाग होता.राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची पाठशाला अंतर्गत स्कुल बस मधुन प्रवास करताना घ्यावयाची काळजी तसेच वाहतुकीमध्ये आदेश देणारी चिन्हे तसेच सावधान करणारी चिन्हे असलेली माहिती पत्रके, विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. उपस्थित नागरिकांना मोटार सायकल चालवित असताना घ्यावयाची काळजी याविषयी पत्रके वाटून प्रत्येक वाहनचालकाने दक्षता घेतली तर स्वत: सोबतच इतराचे जीवनसुद्धा वाचवू शकतो. तसेच सर्वाधिक रस्ते अपघात मोटार सायकलमुळे होत असुन हे अपघात थांबविता येतात, याविषयीचे आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.जड वाहनधारकांनासुद्धा रस्त्यावरून जाताना कोणत्या प्रकारे खबरदारी घ्यावी, जेणे करून जिवित व वित्तहानी होणार नाही. या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जनजागृती अभियानात वाहतूक जिल्हा नियंत्रक चंद्रपूर सुबोध नळकांडे, चिमूर पोलीस तर्फे उपनिरीक्षक मनोज नाले, चिमूर तालुका प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, सचिव कलीम शेख, सहसचिव राजकुमार चुनारकर, कोषाध्यक्ष संतोष देशमुख, जितेंद्र सहारे, फिरोज पठाण व विनोद शर्मा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती
By admin | Published: January 15, 2017 12:51 AM