ऑनलाईन लोकमतसावली : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवार ९ मार्चला सायंकाळी ५ वाजता सावली येथील नगरपंचायत समोरील पटांगणावर शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाविरूद्ध आंदोलन पुकारण्याची रणनिती आखण्यात येणार आहे. या मेळाव्याची पुर्वतयारी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकत्यांची नुकतीच बैठक पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणाºया मेळाव्याला माजी आ. सुदर्शन निमकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दामोधर मिसार, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष बाबुराव गेडाम, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते आदी मार्गदर्शन करणार असून यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्ष प्रशांत गाडेवार, ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष अविनाश राऊत आणि सिंदेवाही तालुकाध्यक्ष दामोधर नन्नावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यात सिंचन सोयीचा अभाव, शासनाची फसवी कर्जमाफी योजना, शेतकºयांच्या समस्यांकडे होत असलेले शासनाचे दुर्लक्ष यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असून अनियमितचा पाऊस आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे वारंवार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. सोबतच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:33 AM
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवार ९ मार्चला सायंकाळी ५ वाजता सावली येथील नगरपंचायत समोरील पटांगणावर शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे.
ठळक मुद्देसावली येथे मेळावा : विविध मागण्यांवर होणार चर्चा