जिल्ह्यातील युवकांनी बेरोजगारीवर मात करुन ऑटोरिक्षाचा व्यवसाय सुरु केला. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे सात हजारच्या जवळपास ॲटोरिक्षाचालक आपली गुजरान करीत होते. मात्र मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. सुमारे तीन ते चार महिने ॲटोरिक्षाचा व्यवसायच बंद राहीला. यावेळी अनेकांनी पर्यायी व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर महामंडळाने बसफेऱ्या सुरु केल्या. तसेच ऑटोरिक्षालासुद्धा परवानगी दिली. मात्र पाहीजे त्या प्रमाणात नागरिक प्रवास करीत नसल्याने ऑटोरिक्षाचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. रेल्वे बंद असल्याने बाहेरचे प्रवासीच नाही. त्यातच पेट्रोल, डिझेलचे भाव गगणाला भीडल्याने ऑटोरिक्षाचालकांना खर्च परवडेनासा झाला आहे. त्यामुळे अनेकांनी आपला व्यवसाय शोधून इतर व्यवसाय सुरु केला आहे. तर अनेकांनी ऑटोरिक्षासोबतच पर्यायी व्यवसाय स्विकारला आहे. त्याच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाची गुजराण होत आहे.
बॉक्स
दिवसभरात केवळ २०० रुपये कमाई
पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने ऑटोरिक्षाचालकांना व्यवसाय परडणाऱ्यासारखा नाही. पूर्वी दिवसभर ऑटो चालविल्यानंतर त्यांना ४०० रुपयांपर्यंत कमाई होत असे. परंतु, आता मात्र २०० रुपये कमाई होणी कठीण झाले आहे.
बॉक्स
महागाईमुळे अडचण
महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. घरभाडे, मुलांचे शिक्षण आदींचा खर्च करताना मोठी ओढताण होत आहे. अनेकांनी कर्ज काढून ऑटोची खरेदी केली. मात्र त्यांना हप्ते भरतानाही नाकीनऊ येत आहे.
कोट
ॲाटोरिक्षाचा व्यवसाय परडवत नसल्याने अनेकांनी व्यवसायच सोडला आहे. तर काहींनी पर्यायी व्यवसाय करीत असून त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाण करीत आहेत.
राजेंद्र खाडेकर,
अध्यक्ष ऑटोरिक्षा संघटना