शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

जीवनदायिनी वर्धा नदीला डबक्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:50 PM

अनेक गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने काही दिवसांपासून नदीला डबक्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. भद्रावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भद्रावतीकरांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई : इतर गावांसह भद्रावतीचा पाणी पुरवठा प्रभावित

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती (चंद्रपूर) : अनेक गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने काही दिवसांपासून नदीला डबक्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. भद्रावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भद्रावतीकरांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. वर्धा नदीच्या पाण्याचा स्तर दररोज एक-एक फुट कमी होत आहे.नदीला लागूनच असलेल्या वेकोलिच्या मातीच्या ढिगाऱ्यांमुये नदीचे पात्र बुजले असून नदीचा प्रवाह बदलला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बेंबळा धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी न. प. भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना केली असून येत्या दोन दिवसात सदर पाणी सुरू करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.भद्रावती न. प. क्षेत्रात एकूण सहा हजार ७०० नळधारक आहेत. भद्रावतीकरांना न. प. व्दारे दररोज ८ लाख लिटर पाणी पुरविण्यात येते. परंतु सध्या पाण्याची टंचाई लक्षात घेता सदर पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. भद्रावतीला यापूर्वी कधीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही. मात्र आता वर्धा नदीलाच पाणी नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वेकोलिच्या एका खदानीमुळे पाणी अडवल्याने नदीची धार बंद झाल्याचे सांगण्यात येते. नदीचे पात्र कोरडे झाले असून ठिकठिकाणी पाण्याचे डबके निर्माण झाले आहे. नदीतील या डबक्यामधूनच न. प. व्दारे भद्रावतीकरांना पाणी पुरवठा केला जात आहे.मार्डा बॅरेजमधील पाणी सोडण्याचे निर्देशवर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद होवून भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असल्याने मार्डा बॅरेजमध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून २.०० दलघमी पाणी ११ मे ला वर्धा नदीमध्ये सोडण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुख्यत: पिण्याच्या पाण्याची निकड लक्षात घेवून पाणी सोडण्याचे औद्योगिक संस्थांना पाटबंधारे विभागातर्फे कळविण्यात आले आहे.ओव्हरबर्डनमुळे पात्र बुजलेवर्धा नदीला अगदी लागूनच असलेल्या चारगा व नवीन कुनाडा कोळसा खदानीच्या ओव्हरबर्डनमुळे नदीचे पात्र बुजून गेले आहे. बºयाच ठिकाणी नदीचा प्रवाह बदलला आहे. ओव्हरबर्डनच्या मातीसोबत आलेले मोठ मोठे दगड आजही नदीच्या पात्रात दिसून येतात. वेकोलिव्दारे ओव्हरबर्डन सभोलताल गारलॅड नाली खोदणे आवश्यक आहे. ज्यामुळे माती नदीत जाणार नाही तर खोदलेल्या नालीत जमा होईल. त्यानंतर सदर नाल्या साफ करता येईल.नदीवरील बंधारा अडलावर्धा नदीमध्ये बंधारा बांधण्यासाठी न. प. भद्रावतीने पाटबंधारे विभागाकडे अर्ज केला. २५ लाख रूपये डिमांड भरण्यास सांगण्यात आले. पालिकेने रक्कमही भरली. परंतु त्यानंतर घोनाडा बॅरेज बंधाºयांच्या नावाखाली सदर बंधाºयांचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. घोनाडा येथे बांधारा बांधण्यात येणार असून त्याचे बँक वॉटर तुमच्याकडे येईल, त्यामुळे तुम्हाला बंधारा बांधण्याचे कारण नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून न. प. ला सांगण्यात आले. २५ लाखाची रक्कमही वापस करण्यात आली. पाटबंधारे विभागाकडून परवानगी न मिळाल्याने येथील बंधाºयांचे काम होऊ शकले नाही. या कामासाठी आलेली सात कोटीची रक्कम बँकेत जमा असून या सात कोटीमध्ये शहरासाठी २४ तास विजेसाठी एक्सप्रेस फिडर तसेच उर्वरित शहरासाठी पाईप लाईन मंजूर करण्यात यावी, अशी मागणी न. प.ने शासनाकडे आहे.वर्धा नदी आटल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईमुळे काही दिवस मुबलक पाणी मिळणार नाही. पाणी वापराबाबत काटकसर करा. येत्या दोन दिवसात बेंबळा धरणाचे पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष, भद्रावती

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी