लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : येथील रामदास दुर्कीवार यांच्या राईस मिल परिसरात असलेल्या मिरचीच्या सातऱ्याला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारात अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे मिरची व बारदाना मिळून दहा-बारा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.नागपूर येथील मिरची व्यापारी यांनी नवरगाव येथे मिरचीचे देठ तोडण्यासाठी सदर राईसमील परिसरात सातरा मांडला होता. या ठिकाणी दररोज दीडशे- दोनशे कामगार मिरचीचीचे देठं तोडण्याचे काम करीत असतात. नेहमीप्रमाणे शनिवारलाही हे काम सुरू असताना मिरची सातऱ्याला व वर छावणीसाठी बांबु टाकून बांधलेला पोत्यांवर अचानक आग लागली. काही कामगाराच्या लक्षात ही घटना येताच कामगार सैरावरा पळू लागले. तोपर्यंत लगेच आगीने रौद्ररूप धारण केले. प्रत्येक कामगार आपला जीव वाचविण्यासाठी तर काही कामगार मालकाच्या मिरचीचे नुकसान होऊ नये म्हणून मिरचीच्या पोत्यासह बाहेर कसेबसे पळाले.आग नेमकी कशी लागली, हे कळू शकले नाही. मात्र, दुपारी कडक उन्हामुळे मिरची मोडतात. तेव्हा दुपारी त्यावर पाणी मारले जाते. यासाठी लगतच्या विहिरीवर पाणी मारण्यासाठी मोटारपंप बसविला होता. मोटारपंप सुरू करण्यासाठी स्वीच आॅन करताच ठिणग्या उसळल्या. यातील ठिणगी मिरच्यांच्या पोत्यावर पडून आग लागली असावी, असा अंदाज तेथील कामगारांनी वर्तविला. ज्या परिसरात आग लागली, तिथे विद्युत विभागाची डिपी होते. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.उपस्थिती रजिस्टरही जळालेया सातऱ्यावर काम करणाऱ्या मजुरांचे कामगार हजर असण्याचे रजिस्टर व माल ने-आण करण्याचे रजिस्टर जळाल्याने आपली मजुरी मिळणार की नाही अशी सभ्रमावस्थी मजुरवर्गामध्ये निर्माण झाली आहे.
नवरगावात मिरचीच्या सातऱ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:44 AM
येथील रामदास दुर्कीवार यांच्या राईस मिल परिसरात असलेल्या मिरचीच्या सातऱ्याला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारात अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे मिरची व बारदाना मिळून दहा-बारा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देदहा लाखांचे नुकसान । मिरची व बारदाना जळून खाक