लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागांना एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. हा दर्जा प्राप्त करणारे गोंडवाना विद्यापीठातील हे पहिले महाविद्यालय ठरले आहे, यामुळे कामाला गती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा यांनी सोमवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली.केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाची मानके ठरविण्यात आली आहेत. या मानकांचे जी महाविद्यालये पालन करतात. अशा संस्थांची तपासणी व मुल्यांकन ठरविण्याची जबाबदारी राष्ट्रीय स्तरावर एनबीए संस्थेकडे आहे. या संस्थेद्वारे संस्थेतील जे विभाग मानकांचे पालन करतात त्याच विभागांना हा दर्जा दिला जातो. एनबीए कडून २० ते २२ जुलै रोजी चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विभागांची तपासणी करण्यात आली. त्यामधील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागांना विशेष मान्यता देण्यात आली. तर एका विभागाला केवळ तीन टक्के गुण कमी पडले आहेत. त्यासाठी संस्थेने पुर्न:मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतल्याचे प्राचार्य भुतडा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विभागप्रमुख प्रा. नेहे, प्रा. राजुरकर, प्रा. ढोमणे, प्रा. कुलकर्णी, प्रा. बेडेकर आदी उपस्थित होते.
चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीएचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 8:13 PM
केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागांना एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.
ठळक मुद्देजी. जी. भुतडा यांची माहिती गोंडवाना विद्यापीठातील पहिले महाविद्यालय