शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती: गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे.माणिकगड किल्ल्यावर चढताना पहिल्या प्रवेशद्वारावरील हरिण गेटच्या मागच्या बाजूस भुयारी रस्ता बंद झाल्याची माहिती उजेडात आली. त्यामुळे वनविभागाने मोहीम राबवून भुयारी मार्ग शोधण्यात यश मिळविले. त्या भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नसल्याने ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे. भुयारी रस्त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असल्याचे आढळून आले. याबाबत वनविभागाने पुरातत्व विभागाला तातडीने कळविले व भुयारी मार्ग मोकळा करावा व हा भुयारी मार्ग नेमका कशासाठी तयार केले आणि कुठे जातो, यावर संशोधन करण्याची गरज आहे. या परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. नव्या पिढीला याची माहिती मिळावी, म्हणून अभ्यासकांनी पुुढाकार घेतला पाहिजे. शिवाय, पुरातत्त्व विभागाने या भुयारी मार्गाचा अभ्यास करून ऐतिहासिक माहिती पुढे आणली पाहिजे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या भुयाराकडे कुणाचेही लक्ष नाही. वनविभागाच्या माध्यमातून या भुयाराची माहिती परिसरातील जनतेला मिळाली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने संशोधकांची चमू पाठवून अभ्यास करणे गरजेचे होते. परंतु, सद्य:स्थितीत याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी, इतिहास दुर्लक्षित राहिला आहे.घोडपार्क ढासळतोयपुरातन काळाची साक्ष देत असलेल्या, घोडपार्क आणि राणीमहलचे संरक्षण भिंत प्रवेशद्वार पूर्णत: जमिनदोस्त झाले. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आता अवशेष शिल्लक राहिले नाहीत. किल्ल्याकडे दुर्लक्ष होत राहिल्यास किल्ल्यावरील पुरातन वास्तू नष्ट होण्याचा धोका आहे.पायºयांचा मार्ग खडतरइतिहासाची साक्ष देणाºया माणिकगड किल्ल्यावरील वाढती वर्दळ पाहता येथील राणीमहल व पाताळ विहिरीकडे जाणाºया मार्गावर पायºयांचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील पायव्याचे कामही अर्धवट असल्याने हा मार्ग पर्यटकांसाठी खडतर ठरत आहे.किल्ल्यावर बैठक व्यवस्थाच नाहीकिल्ल्याचा मार्ग किंवा पायºया चढताना पर्यटक व सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची दमछाक होते. किल्ल्याचा आनंद घेताना प्रत्येक ठिकाणी बसण्याची सोय हवी आहे. पण संबंधित विभागााचे लक्ष नाही. पर्यटकांना व सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
माणिकगडावरील भुयार उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:45 PM
गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही.
ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : ऐतिहासिक वारशावर संशोधन करण्याची गरज