आॅनलाईन लोकमतवरोरा : आंतराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास विविध क्षेत्रातील महिला आणि पुरूष एकत्र येतात. ही अत्यंत भुषणावह बाब आहे. परंतु, जोपर्यंत या देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील महिला निर्भयपणे जीवन जगणार नाहीत, तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार थांबणार आहे. तो पर्यंत महिलादिन साजरा करण्यामध्ये कुठलेही स्वारस्य नाही. त्यामुळे विविध संस्था, संघटना तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेमार्फत सामाजिक प्रबोधनाची चळवळ चालवावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.वरोरा येथील नगर भवन येथे शनिवारी महिला दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री संजय देवतळे, डॉ. अनिल बुजोणे, ज्येष्ठ भाजपा नेते विजय राऊत, भाजपा जिल्हा सरचिटणीस राहूल सराफ, नगराध्यक्ष अºहतेशाम अली, जि. प. माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर अंजली घोटेकर, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, रोहिणी देवतळे, डॉ. भगवान गायकवाड, बाबा भागडे, सुरेश महाजन, निंबाळकर, शेखर चौैधरी, मनोहर कुळसंगे, जि. प. सदस्य मारोती गायकवाड आदी उपस्थित होते. अहीर पुढे म्हणाले, समाज निर्मितीमध्ये महिलांचे अनन्यसाधारण असे योगदान आहे. गर्भसंस्कार देणारी ही माता देवी म्हणून पुजल्या जावी, तिची अनेक रूपे आहेत. त्या रूपांचे स्मरण करून प्रत्येकांनी तिला सन्मान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.संविधानाने महिला व पुरूषांना समान अधिकार दिले आहेत. त्याचाही सन्मान संविधानरक्षकांनी केला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासारख्या योजनेला सुरुवात केली असून महिलांच्या सन्मानासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
अन्याय रोखण्यासाठी प्रबोधनात्मक चळवळीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:27 PM
आंतराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास विविध क्षेत्रातील महिला आणि पुरूष एकत्र येतात. ही अत्यंत भुषणावह बाब आहे.
ठळक मुद्देहंसराज अहीर : वरोरा येथे भाजपातर्फे कार्यक्रम