सुधीर मुनगंटीवार : राजुरा येथे दारू व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन शिबिरराजुरा : व्यसनमुक्ती काळाची गरज असून व्यसनमुक्त समाज निर्मिती करण्यासाठी समाजातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त झाला. परंतु व्यसनाधिन समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी गावोगावी प्रबोधन करण्याची गरज असून प्रबोधनातून व्यसनमुक्ती ही संकल्पना राबवून व्यसनमुक्त समाज निर्मिती करू, असे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना राजुरा द्वारा आयोजित दारू व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिराप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. राणी बंग म्हणाल्या, समाजातील व्यसनाधिनता नष्ट करण्यासाठी युवकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. व्यसन कुठलेही असो, मानवाचे जीवन नष्ट करते, असे सांगितले. याप्रसंगी शिरपूर येथील संतोष महाराज यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अॅड.एकनाथराव साळवे, नगराध्यक्ष अरुण धोटे, आरती बंग, चंदू पाटील मारकवार, पं. स. सभापती कुंदा जेनेकर, ज्योती ठावरी, संजय बुटले, राजेश कुकवास, बाबुराव भाजीपाले, यशवंत उके, श्रीनिवास सहारे, लक्ष्मीकांत धानोरकर, अनिल डोंगरे, दिगांबर वासेकर, दिवाकर शेंडे, बालाजी निकोडे, रावा जिवतोडे, आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
व्यसनमुक्त समाज निर्मितीची गरज
By admin | Published: April 18, 2017 12:51 AM