लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनतेने सज्ज व्हावे, असे आवाहन विदर्भवादी नेते अॅड़ वामनराव चटप यांनी केले़वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या चळवळींना एकत्र करण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी मूल, सावली, भद्रावती, गोंडपिपरी, सावली, वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात पार पडलेल्या सभेत हिराचंद बोरकुटे, प्रा़ एस़ टी़ चिकटे, कवडू येनप्रेडीवार, गोपाल रायपुरे, मनोहर गेडाम, अरुण वासलवार, गिरीधर बैस, प्रभाकर दिवे, राम नवले, विजया धोटे, मितीन भागवत व अन्य मान्यवर उपस्थित होते़ नागपुरात मेळाव्या घेण्याबाबत चर्चा करण्यात आली़ युवकांना सहभागी होण्याचे आवाहन मान्यवरांनी केले़
विदर्भ राज्यासाठी सज्ज होण्याची गरज- चटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:53 PM
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनतेने सज्ज व्हावे, असे आवाहन विदर्भवादी नेते अॅड़ वामनराव चटप यांनी केले़
ठळक मुद्देस्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनतेने सज्ज व्हावे,