लोकमत न्यूज नेटवर्कमूल : आजचे युग स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढणे महत्त्वाचे आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या नवनवीन तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग व्हावा व तळागाळातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पातळी वाढावी, यासाठी नगर परिषद मूलच्या वतीने प्राथमिक शाळांना डिजिटल वर्गासाठी धनादेश दिला जात आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच होईल, असा आशावाद नगर परिषद मूलच्या नगराध्यक्षा प्राचार्य रत्नमाला भोयर यांनी व्यक्त केला.नगर परिषद मूलच्या वतीने मूल क्षेत्रातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळांना डिजीटल वर्गासाठी एलईडी टिव्ही व साहित्य खरेदीसाठी धनादेश वाटपाचा कार्यक्रम नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.यावेळी नगरपरिषदेचे शिक्षण व सांस्कृतिक सभापती प्रशांत ताडवे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, नगर परिषदेचे सभापती मिलिंद खोब्रागडे, संगिता वाळके, नगरसेवक विद्या बोबाटे, अनिल साखरकर, वंदना वाकडे, रेखा येरणे, प्रभा चौथाले, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, सुनिता बुटे, तक्षशिला रामटेके, अनघा नक्कुलवार आदी उपस्थित होते.यावेळी मुख्याधिकारी सरनाईक यांनी मूल शहरातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना शासनाच्या शैक्षणिक विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून शाळेचा दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, असे मत प्रास्तविकेतून केले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते मनमोकळे, सोबतच आदरयुक्त असले पाहिजे, असेही यावेळी पाहुण्यांनी सांगितले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी शिक्षणाचा दर्जा व विकास या विषयावर मत मांडले. यावेळी मूल शहरातील जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक आठ शाळांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व न.प. कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:04 AM
आजचे युग स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढणे महत्त्वाचे आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.
ठळक मुद्देनगराध्यक्ष : पालिकेतर्फे साहित्य खरेदीसाठी धनादेशाचे वाटप