शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

महापुरूषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:42 AM

शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देहेमंत देशमुख : ऊर्जानगरात गोंडीयन समाजाचा प्रबोधन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले. उर्जानगरातील स्नेहबंध सभागृहात गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वीरांगना महाराणी दुर्गावती शहिद दिनानिमित्त सत्कार व मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक बी. डी. मडावी, महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, प्रबोधकार दिलीप सोळंके, लोकश मडावी, गोंडराजे विरेंद्र्रशाह आत्राम, सुनील गावडे, मनोज आत्राम, स्मिता कोवे, चंद्रशेखर सेडमाके, वानखेडे, प्राचार्य डॉ. विजय खंडाते व गोंडीयन आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या काळात पारंपरिक शिक्षण न घेता आधुनिक कौशल्य शिक्षण घेतले पाहिजे. वैयक्तिक क्षमतांचा विकास करून येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार व्हावे, असे विचार दिलीप सोळंके यांनी मांडले.अर्चना खंडाते यांना राणी हिराई सामाजिक पुरस्कार व महादेव देवाजी मडावी यांना गोंडवाना भूषण पुरस्काराने व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. सुधाकर मडावी यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी व माऊंट एव्हरेस्ट सर करणाºया शूर गिर्यारोहकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. खासदार बाळू धानोरकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.मुख्य अभियंता राजु घुगे म्हणाले, आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. परंतु, जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचन वाढवावे. विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. यश मिळविण्यासाठी हाच एक पर्याय आहे. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संघटनेच्या विविध उपक्रमांची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. लोकश मडावी, गोंडराजे विरेंद्रशाह आत्राम सुनील गावडे, मनोज आत्राम, स्मिता कोवे, चंद्रशेखर सेडमाके, वानखेडे प्राचार्य डॉ. खंडाते यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन रमेश कुंभरे, प्रास्ताविक, सुधाकर कन्नाके यांनी केले. सुनिल तलांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विजय तोडासे, ज्योती रावन गावडे राजेंद्र किन्नाके, प्रमोद इरपाते, प्रमोद कोवे, राजु कुंभरे, माणिक परचाके, रविंद्र पुसाम, बंडू कुळमेथे, सुभाष कोवे, प्रा धीरज शेडमाके, सुनील तलांडे, संजय तोडासे, निलेश कुमरे, अमृत आत्राम, दिनेश कुमरे, सारंग कुंभर, विद्यार्थी व गोंडीयन समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षण