लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनाचे सामर्थ्य वाढविल्यास अनेक विकारांपासून मुक्ती मिळविता येते. त्यामुळे मानवी मनाचे आरोग्य जपण्याची आज गरज आहे, असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी व्यक्त केले. सामान्य रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्हा कारागृहात घेण्यात आलेल्या जागतिक सिझोफ्रेनिया दिन कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सी. आर. बलवाणी तर मंचावर कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, डॉ. साची बंग, डी. पी. वनकर, कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित डांगेवार, ललित मुंडे, पराग उराडे, महिला बाल कल्याण विभागाच्या संरक्षण अधिकारी प्रिती उंदीरवाडे, प्रिया पिंपळशेंडे, समुपदेशक अंजु काळे, शिक्षण विभागाच्या अर्चना मरिसकर, अॅड. रितेश संघवी अशासकीय संस्थेच्या प्रतिभा मडावी कायदेविषयक विधी सल्लागार संध्या तोगर उपस्थित होते. डॉ. देशपांडे यांनी सिझोप्रेनीया या मानसिक रोगाची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली.डॉ. डांगेवार यांनी कार्याच्या आयोजनाची भूमिका मांडली. डॉ. बंग यांनी राग का येतो? रागाचे प्रकार कोणते? राग या मनोभावनेला कसे हाताळावे, या विषयी मार्गदर्शन केले. मनोविकृती चिकित्सक बनकर यांनी स्वत:मध्ये बदल करून सकारात्मक मानसिकता सकारात्मक कशी निर्माण करावी, यासंदर्भात विचार मांडले. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे बलवाणी कायदा, आरोग्य, समुपदेशन आणि बंदीवानांच्या मानसशास्त्रावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. मनात आणले तर कोणताही माणूस बदलतो, असेही त्यांनी नमूद केले. अन्य मान्यवरांनीही आरोग्याच्या विविध पैलुंवर मार्गदर्शन केले. यावेळी बंदीवांना मनोगत व्यक्त केले.संचालन ललित मुंडे यांनी केले. यावेळी वरिष्ठ तुरूंगाधिकारी नागनाथ खैरे, तुरुंगाधिकारी सुनील वानखडे, विठ्ठल पवार, सुभेदार अशोक मोटघरे, हवालदार राजेंद्र देशमुख, रक्षक लवकुश चव्हाण, उदय जाधव, महिला रक्षक रूपाली राठोड आदी उपस्थित होते.
मानवी मनाचे आरोग्य जपण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:01 PM
मनाचे सामर्थ्य वाढविल्यास अनेक विकारांपासून मुक्ती मिळविता येते. त्यामुळे मानवी मनाचे आरोग्य जपण्याची आज गरज आहे, असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. किरण देशपांडे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देकिरण देशपांडे : जिल्हा कारागृहात जागतिक सिझोफ्रे निया दिन