लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्तमान समाजात विविध प्रश्नांची गुंतागुत वाढत आहेत. त्यामुळे डॉ. एस. टी. चिकटे यांच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रबोधनासाठी गरज होती. शिक्षणाला प्रज्ञा व शिलाची जोड दिली पाहिजे, असे भगवान बुद्धाने सांगितले. माणसे जोडून घेता आली पाहिजे, हा संदेशही मोलाचा आहीे. आज वंचितांना समान व मोफत शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठी चळवळी व्यापक झाल्या पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले.प्रा. चिकटे यांच्या बौद्ध धम्माची शैक्षणिक क्रांती, निळी किरणं व निळ्या रेजिमेंटचा शिपाई या तीन ग्रंथांच्या लोकार्पण समारंभात ते स्थानिक रेडक्रास भवनात बोलत होते. फुले आंबेडकरी स्टडी ग्रुप आणि आंबेडकरी सािहत्य प्रबोधिनीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज निमसरकर, सत्यशोधक समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, किशोर पोतनवार, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे, प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम उपस्थित होते.सुराणा म्हणाले, चळवळी सक्षम करण्यासाठी नव्या पिढीपर्यंत प्रबोधनाचा विचार पोहोचविला पाहिजे. आंबेडकरी चळवळीच्या विविध पैलुंवर विचार मांडले. निमसरकर म्हणाले प्रा. डॉ. मेश्राम यांनी प्रा. चिकटे यांच्या ग्रंथांवर प्रकाश टाकला. किशोर पोतनवार, बोरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले. विदर्भवादी चळवळीला एक नैतिक आधार मिळाल्याचा उल्लेख अॅड. टेमुर्डे यांनी केला. मूळच्या चंद्रपूर येथील पण सध्या पश्चिम बंगाल येथे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करणाऱ्या ममता कपीलकृष्ण ठाकूर यादेखील लोकार्पण समारंभाला उपस्थित होत्या.चिकटे यांच्या अकाली निधनामुळे सामाजिक व शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. संचालन प्रा. डॉ. इसादास भडके व शुद्धोधन मेश्राम यांनी केले.प्रास्ताविक प्रा. शैलेंद्रकुमार चिकटे यांनी केले. स्रेहल चिकटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी शकुंतला चिकटे, रोशन वाकडे, सुनिल जांभुळे, शुद्धोधन मेश्राम, नागेश सुखदेवे, त्रिलोक शेंडे, गोपी मिश्रा व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वंचितांना मोफत शिक्षण देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:43 PM
वर्तमान समाजात विविध प्रश्नांची गुंतागुत वाढत आहेत. त्यामुळे डॉ. एस. टी. चिकटे यांच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रबोधनासाठी गरज होती. शिक्षणाला प्रज्ञा व शिलाची जोड दिली पाहिजे, असे भगवान बुद्धाने सांगितले. माणसे जोडून घेता आली पाहिजे, हा संदेशही मोलाचा आहीे. आज वंचितांना समान व मोफत शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठी चळवळी व्यापक झाल्या पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देपन्नालाल सुराणा : रेडक्रास भवनात ग्रंथ लोकापर्णनिमित्त प्रबोधन