नाना श्यामकुळे : जिल्हा क्रीडा संकूल येथे जागतिक योग दिनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : व्यक्तीचे शरीर सुदृढ, समृध्द व सक्षम राहण्यासाठी नियमित योग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. नाना श्यामकुळे यांनी केले. तिसऱ्या जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र, क्रीडा विभाग व भारत स्वाभिमान, पंतजली योगपीठ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे तिसरा जागतिक तृतीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, भारत स्वाभिमान पतंजली योग समितीचे गोपाल मुंधडा व शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते. यावेळी ऋषीपाल गहलोत यांनी शारिरीक हालचाली, वृक्षासन, ताडासन, पश्चिमोतानासन, कपालभारती, नाडीशुध्दी प्रणायाम असे विविध आशुष उपस्थित नागरिकांकडून करुन घेतले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी, १५ तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर योग दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व तालुक्यामध्ये योग कार्यक्रमात एकसुत्रता असावी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पतंजली योग समितीच्या वतीने तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यामुळे या योग दिनाच्या कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार व कार्यक्रमाचे आयोजन सर्व ठिकाणी करण्यात आल्याचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य नागरिकांनी हजेरी लावली. यशस्वीतेसाठी आर.बी.वडते, पंडीत चव्हाण, सचिन मांडवकर, मनिषा मानकर, राजेंद्र आव्हाड, संजय भरडकर, वाल्मिक खोब्रागडे, पवन साटोणे, निलकंठ चौधरी, विशाल चव्हाण व स्वयंसिध्दा प्रशिक्षक खुशबू चोपडे व सर्व महिला स्वयंसिध्दा व इतर सर्व योग समिती पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. संचालन मोंटू सिंग व आभार साधना केकतपुरे यांनी मानले.
सुदृढ व सक्षम शरिरासाठी नियमित योगा करण्याची गरज
By admin | Published: June 22, 2017 12:38 AM