लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छतेअभावी विविध आजारांची लागण होण्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे स्वच्छतेबाबत सर्वांनी जागृत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. स्वच्छता अभियानदरम्यान घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार विद्यार्थी व नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. याकरिता निबंध, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तु निर्मिती स्पर्धा, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समूहगीत, रांगोळी, भजनसंध्या आदी स्पर्धांचे आयोजन महानगरपालिका स्तरावर करण्यात आले होते. महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीत विविध ६ शाळांमधील ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरातील विविध ५२ शाळांनी प्राथमिक फेरीत सहभाग घेतला. त्यातील प्रथम ३ विद्यार्थ्यांची निवड अंतिम स्पर्धेसाठी झाली. स्पर्धकांची सर्वोत्तम चित्रे, रांगोळी, टाकाऊ सामुग्रीपासून निर्माण केलेल्या अभिनव वस्तुंची प्रदर्शनी ठेवण्यात आली होती. सेल्फी पॉर्इंट व स्वच्छतेची सायकल विशेष आकर्षण होते. महानगरपालिका स्वच्छता विभाग तसेच मल्टिपर्पज सोसायटी फॉर द डेव्हल्पन्समेन्ट आॅफ व्हिलेज इकॉनॉमी, आरोही बहुद्देशीय सामाजिक संस्था व एएसपीएम क्रीएशन, सीडीसी बँक, चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, गुरुकुल शिक्षण संस्था, मैत्र मांदियाळी बहुद्देशीय संस्था, रोटरी क्लब, पीएनजी ज्वेलर्स, टिकमचंद ज्वेलर्स, येल्लेवार ज्वेलर्स, विजय विंग्स, तिरुपती आॅप्टिकल्स, एन डी हॉटेल, नागिनबाग व्यायाम प्रसारक मंडळ, चेतन धोपटे, काजू जोशी, मुकेश मटके यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्वच्छतेबाबत जागृत राहण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:26 PM
स्वच्छतेअभावी विविध आजारांची लागण होण्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे स्वच्छतेबाबत सर्वांनी जागृत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. स्वच्छता अभियानदरम्यान घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
ठळक मुद्देअंजली घोटेकर : चित्रकला स्पर्धेला शेकडो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद