मुकुंद खैरे : आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म संसदेत प्रतिपादनचंद्रपूर : बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार ब्राम्हणी पंड्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद २५(२) मध्ये दुरुस्ती करून बौद्ध धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून घटनात्मक मान्यता प्रदान करावी लागेल यासाठी राष्ट्रीय पातळीवर बौद्ध धर्मियांच्यासंघटनाद्वारा बौद्ध भिक्षुंच्या नेतृत्वात संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन समाजक्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांनी बौद्धगया येथील आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या पाचव्या बौद्ध धर्म संसदमध्ये ‘बौद्धांचा स्वतंत्र कायदा आणि महाबोधी विहारमुक्ती’ या विषयावर बोलताना केले. संसदच्या अध्यक्षस्थानी बोधगया येथील आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्राचे संचालक संघराजा डॉ. भिक्खु सत्यपाल महाथेरो होते. संसदेचे संचालन बौद्ध संघटनांच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय संयोजक आसाराम गौतम यांनी सांभाळले. विचार मंचावर चकमा भंते प्रियपाल, भंते आनंद (उत्तरप्रदेश), भंते धम्मपाल (हरियाणा), भंते बुद्धशरण केसोरिया (बोधगया), भंते शिलानंद बोधी (महाराष्ट्र) आदींची उपस्थिती होती.यावेळी प्रा. खैरे यांच्या सोबत जिल्हाप्रमुख सागर बोरकर, रविकुमार वाघमारे, मारोती लोखंडे, शिंदे गडचांदूर इ. सहभाग होता. अनिल काळबांधे (शहर प्रमुख) पथाडे महिला आघाडी प्रमुख सुरेश फुलझेले, सिद्धार्थ घटमनकर आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)
बौद्धांच्या स्वतंत्र कायद्यासाठी संघर्षाची गरज
By admin | Published: September 21, 2016 12:47 AM