लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता राखावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागाळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोगंळे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, पंचायत समिती सदस्य प्रेम चिवंडे, जि.प. सदस्य रणजीत सोयाम, विजय राऊत, नामदेव डाहुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, गटविकास अधिकारी राजू आंनदपवार आदी उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने मोलाची कामगिरी पूर्ण केली आहे. यातून चांगला संदेश समाजात गेला आहे. आमदार शामकूळे यांनी उद्योजकांनी सामाजिक दायित्व जपावे असे मत व्यक्त केले. अध्यक्ष भोंगळे सीईओ जितेंद्र पापळकर यांनीही सर्वांगीण स्वच्छता मोहीम महत्त्वाची असून यामधून सशक्त ग्राम निर्माण करा, अशी भूमिका मांडली. समाज कल्याण सभापती पाझारे यांनी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती दिली.संचालन गटविकास अधिकारी राजू आंनदपवार यांनी केले. कार्यक्रमाला पिपरी ग्रामपंचायतचे सरपंच पारस पिपळकर, परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमाणात उपस्थित होते. ना. अहीर यांचे हस्ते विकास कामांची सुरुवात करण्यात आली.
शाश्वत स्वच्छता काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:24 PM
जिल्हा हागणदारी मुक्त झाला असून गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता राखावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. नागाळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ठळक मुद्देहंसराज अहीर : नागाळा येथे विकास कामांची सुरुवात