अतिक्रमण वाढले : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टी. चंद्रशेखर यांचा कित्ता गिरवावाघनश्याम नवघडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागपूरचे आयुक्त असताना टी. चंद्रशेखर यांनी जी धडाडी दाखवून नागपूरचा कायापालट केला, त्याला तोड नाही. नागभीड ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झाल्यानंतर नागभीडचे स्वरूप बदलवायचे असेल तर नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी टी. चंद्रशेखर यांचा कित्ता गिरविण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया आता येथे व्यक्त होऊ लागल्या आहेत.नागभीड नगरपरिषदेचा थोडा जरी विचार डोळ्यासमोर आणला तर नागभीडमध्ये प्रत्येक समस्या आवासून उभी आहे. तत्कालीन ग्रा.पं.च्या निष्काळजीपणामुळे या समस्यांनी आता उग्र रुप धारण केले ,असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. येथील वाढते अतिक्रमण आता नागभीडचा गळा घोटू पाहात आहेत. येथे पाण्याची समस्या आहे. जड वाहतुकीची समस्या आहे. येथे रस्त्यांची समस्या आहे. लाईट व्यवस्थेची समस्या आहे. यासोबत आणखी अनेक समस्या अनेक वर्षांपासून सुटू शकल्या नाहीत. नागभीडमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील ज्या काही समस्या असतील, त्यांची यादी वेगळीच आहे.एका दिवशी किंवा एका वर्षात या सर्वच समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षाही कोणी व्यक्त करणार नाही. पण त्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा कोणी व्यक्त केली तर ते चुकीचेही ठरणार नाही. लोकशाहीतील लोकप्रतिनिधींची एकंदर मानसिकता लक्षात घेतली तर या लोकशाहीतील प्रतिनिधींना समस्येशी संबंध असणारा कोणी ना कोणी जवळचा असतो. त्याने आपल्याला मदत केली होती. मी त्याचे वाईट कसे करु, या भावनेने काही लोकप्रतिनिधी निष्प्रभ ठरत आले आहेत. यातून एका नव्या समस्येचा आणखी जन्म होतो आणि नेमक्या याच विचारधारेतून नागभीडभोवती समस्यांचा विळखा निर्माण झाला आहे. आता या समस्याचे निरसन करण्याचे आव्हान नागभीड नगर परिषदेच्या नवीन मुख्याधिकारी मेघना वासनकर यांच्या समोर आहे. वासनकर यांनी पुढाकार घेवून नागभीडच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविले, मुख्य रस्त्यांची निर्मिती केली आणि शहरातून होत असलेली जडवाहतूक बंद केली तरी नागभीड मोकळा श्वास घेईल. वासनकर यांना हे करीत असताना काही प्रमाणात आडकाडी येईलही. पण टी. चंद्रशेखर यांचा कित्ता गिरवून त्यांनी हे करावे, अशी अपेक्षा आहे.लोकप्रतिनिधींचाही पुढाकार महत्त्वाचानुसत्या वासनकर यांनीच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशातलाही हा भाग नाही. नागभीड नगपरिषदेच्या ज्या-ज्या लोकप्रतिनिधींच्या सद्सदविवेकबुद्धीला हे पटते, त्या-त्या लोकप्रतिनिधींनी यासाठी मदत केली तरी हे पुरसे आहे. वास्तविक, समस्यांचा हा प्रश्न प्रशासकीय काळातच मार्गी लागावा, अशी येथील नागरिकांनी अपेक्षा होती. तसे झाले नाही. आता तरी मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी लोकप्रतिनिधीना सोबत घेऊन या समस्या निकाली काढाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
नागभीडचा कायापालट करण्याची गरज
By admin | Published: June 27, 2017 12:44 AM