शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

समाज विकासासाठी संघटित होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:00 AM

तेली समाजाची संख्या विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, समाज संघटीत नसल्यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी तेली समाज बांधवानी संघटित होणे काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज नागपूरचे येष्ठ उपाध्यक्ष प्रा. बबनराव फंड यांनी केले.

ठळक मुद्देबबनराव फंड : उपरी येथे समाज प्रबोधन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कउपरी : तेली समाजाची संख्या विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, समाज संघटीत नसल्यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी तेली समाज बांधवानी संघटित होणे काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज नागपूरचे येष्ठ उपाध्यक्ष प्रा. बबनराव फंड यांनी केले.सावली तालुक्यातील उपरी येथे श्री संताजी बहुउद्देशीय प्रसारक तेली समाज संघटनेच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सव व समाज प्रबोधन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, रघुनाथ शेंडे जिल्हा महिला अध्यक्ष मीनाक्षी गुजरकर, गंगाधर कुनघाडकर, महासचिव दिवाकर पा. भांडेकर, माजी जि. प. सदस्य वैशाली कुकडे, पं. स. सदस्य गणपतराव कोठारे, माजी जि. प. सदस्य भालचंद्र बोदलकर, निलकंठ नैताम, संतोष नैताम, संजय सातपुते, नागोराव कोठारे, पांडुरंग शेटे आदी उपस्थित होते.यावेळी प्रा. फंड पुढे म्हणाले, समाजाला संघटीत करण्यासाठी सर्वात मोठे माध्यम प्रबोधन आहे. त्यामुळे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्थानिक तेली समाज संघटनेतर्फे सूर्यकांत खनके, मीनाक्षी गुजरकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.महोत्सवानिमित्ताने गावात संत शिरोमनी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखीची रामधून शोभायात्रा काढण्यात आली. समाज मंदिराचे भूमिपूजन व ध्वजारोहण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी संताजीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे संचालन व आभार सावली तालुका तेली समाज संघटनेचे अध्यक्ष तु. बा. कुनघाडकर यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.