अलीकडे नगर परिषदचे विभागीय अधिकारी, अभियंता यांनी टेबलवर बसूनच काम करण्याचे सूत्र अविलंबविल्यामुळे शहरातील विकासकामात मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरात अनेक अवैध बांधकाम होत आहे. परंतु योजना विभागाचे याकडे लक्ष नाही. यामुळे दीड फूट जागेसाठी शेजारी आपसात भांडत आहे. २० वर्षांआधी हनुमान वॉर्डात नाल्या शेजारी नगर परिषदने पाच खोल्यांचा पायवा बांधून शॉपिंग काम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष सुरेश गलानी यांनी केला होता. आता त्या बांधकामावर दुसऱ्याचे अतिक्रमण आहे व ते हटवायला नगर परिषद तयार नाही. त्याच ठिकाणी नाल्याच्या काठावर पडक्या अवस्थेत मुत्रीघर आहे. परंतु येथेही एखाद्याचा अपघात होण्याची नगर परिषद वाट पाहत आहे. यामुळे नगर परिषदचे फार मोठे नुकसान होत आहे. अतिक्रमण केलेल्या शहरात अशा अनेक जागा आहेत व त्यावर अतिक्रमण आहे. परंतु ते काढण्याकडे नगर परिषद दुर्लक्ष करत आहे. ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी व्यावसायिक भवन निर्माण केले, तर नगर परिषदेच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते, असे नागरिकांची म्हणणे आहे.
030921\20210805_081606.jpg
नाल्या शेजारी असलेली नप ची जागा