भद्रावती : तालुक्यातील मराठी साहित्याचे अभ्यासक, कवी, लेखक आणि साहित्यिक यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी योग्य व्यासपीठाचा अभाव होता. या सारस्वतांच्या प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विदर्भ साहित्य संघाच्या भद्रावती शाखेचे उद्घाटन वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
भद्रावती येथील लोकमान्य विद्यालयाच्या सभागृहात विदर्भ साहित्य संघ शाखा, भद्रावतीचे उद्घाटन तसेच नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी लोकसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चंदू पाटील गुंडावार, तर उद्घाटक म्हणून विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, प्रदीप दाते, प्राचार्य डॉ. शाम मोहरकर, डॉ. धनराज खानोरकर व इरफान शेख उपस्थित होते.
बॉक्स
नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष डॉक्टर सुधीर मोते, उपाध्यक्ष प्रवीण आडेकर, सचिव डॉक्टर ज्ञानेश हटवार, सहसचिव अनिल पिट्टलवार, कोषाध्यक्ष हरिहर येलकर, साहित्यिक प्रमुख डॉक्टर सुरेश परसावार, सांस्कृतिक प्रमुख शालिक दाणव, सदस्य आशालता सोनटक्के, मेघा शेंडे तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून पांडुरंग कांबळे, सु. वी. साठे, विवेक सरपटवार, गुणवंत कुत्तरमारे, रमेश भोयर आदींनी पदभार सांभाळला.
020921\img-20210825-wa0075.jpg
सारस्वतांच्या प्रतिभेला भरारी मिळवून देण्यासाठी नवे व्यासपीठ. विदर्भ साहित्य संघाची कार्यकारनी गठीत.