लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : येथे अद्ययावत पोलीस स्टेशनचे बांधकाम करण्यात आले. या पोलीस स्टेशनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने अखेर नाईलाजाने जुन्या इमारतीतील पोलीस स्टेशनचा कारभार नव्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटनापूर्वीच शुक्रवारी नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला.इंग्रजांच्या काळातील जुने पोलीस स्टेशन वाढत्या लोकसंख्येला अपूरे पडत होते. तसेच सदर पोलीस स्टेशन शहराच्या मध्यभागी असल्याने तसेच पोलीस स्टेशनच्या सामोर दैनंदिन गुजरी व आठवडी बाजार भरत असल्याने पोलिसांना प्रकरण हाताळताना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. आरोपींकरिता अपूरे बंदीगृह, जप्ती भांडार, अधिकाऱ्यांचे कक्ष, जप्ती वाहनतळ, कर्मचाºयांच्या निवासाची अपूरी व्यवस्था अशा विविध समस्या जुन्या पोलीस स्टेशनमध्ये होत्या. परिणामी हे पोलीस स्टेशन अपुरे आणि गैरसोयीयुक्त होते. दरम्यान भाजप-सेना युती सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट पोलीस स्टेशन उभारण्याचे ठरविले. यात भद्रावती पोलीस स्टेशनचा समावेश होता. कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाच्या समोर कर्मचाºयांच्या वसाहतीसह अद्यावत पोलीस स्टेशन उभारण्यात आले. काम पूर्ण होवून अनेक महिन्याचा काळा लोटला परंतु, त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघत नसल्याने काही कर्मचारी आणि अधिकाºयांनी येथील आपल्या नव्याने उभारलेल्या वसाहतीतील निवासस्थानी प्रवेश केला, असे करता-करता अनेक कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. कर्मचारी नव्या वसाहतीत तर पोलीस स्टेशन जुन्या ठिकाणी असे सुरू होते. उद्घाटनाचा मुहूर्त आज ना-उद्या निघेल या प्रतीक्षेत असलेले अधिकारी व पोलीस कर्मचारी अखेर कंटाळून त्यांनी हळू-हळू पोलीस स्टेशनच्या साहित्याचे स्थानांतरण करणे सुरू केले. त्यात जप्त वाहने, अवैध दारूचा साठा, रेकॉर्ड त्या ठिकाणी नेणे सुरू केले. तर शुक्रवारी नव्या इमारतीतीच संपूर्ण कामकाज सुरू करण्यात आल्याने तक्रारकर्ते जुन्या पोलीस स्टेशनमध्ये जात असल्याने त्यांना हेलपाटा माराव्या लागत आहे.अशी आहे नवी इमारतपोलीस स्टेशनची वसाहत ७० हे.आर. जागेत बांधण्यात आली. त्यात ५२ कर्मचाºयांची व सहा अधिकाºयांची निवासस्थाने, एक पोलीस स्टेशन, अशी अद्यावत इमारत बांधण्यात आली आहे.नवीन पोलीस स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पोलीस स्टेशनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नव्हती. तर जुने पोलीस स्टेशन गैरसोयीचे असल्याने तसेच अधिकारी व कर्मचारी नव्या वसाहतीत गेल्याने पोलीस स्टेशन देखील नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. नव्या पोलीस ठाण्याचे नंतर उद्घाटन करण्यात येणार आहे.- प्रताप पवार,उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा.
उद्घाटनाविनाच नव्या पोलीस ठाण्यात कामकाज सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 11:59 PM
येथे अद्ययावत पोलीस स्टेशनचे बांधकाम करण्यात आले. या पोलीस स्टेशनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने अखेर नाईलाजाने जुन्या इमारतीतील पोलीस स्टेशनचा कारभार नव्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटनापूर्वीच शुक्रवारी नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला.
ठळक मुद्देमुहूर्तच मिळेना : जुन्या इमारतीतील अडचणींमुळे हलविला कारभार