आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी विदर्भ परिक्षेत्राकरिता नागपूर येथे एकमेव पोलीस ठाणे होते. मात्र, नवे पोलीस ठाणे निर्माण होणार असल्याने वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुकर होणार आहे.नव्या पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारकांशी चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांची प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येणार आहे. मोठ्या शहरांमध्ये पाच पोलीस ठाण्यांना वीज चोरी बाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणचे सहा पोलीस ठाणे बंद करण्यात आले. वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात महावितरण चंद्रपूर परिमंडळातील जिल्ह्यात चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, जिवती व मूल पोलीस स्टेशन असे तीन तर गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी व अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविता येणार आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.दोन कोटींची वीजचोरीचंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली मंडळात आतापर्यंत १ हजार २९५ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. त्यांनी दोन कोटी ४३ लाखांची वीज चोरी केल्याचे आढळले. चंद्रपूर मंडळाने १ एप्रिल २०१७ पासून १ कोटी ५८ लाख रुपयांच्या वीज चोऱ्या एकट्या चंद्रपूर मंडळात उघडकीस आणल्या आहेत. महावितरणने केलेल्या कारवाईत ६४१ वीज चोरांवर गुन्हे दाखल झाले. चंद्रपूर विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ दरम्यान तब्बल ८३ लाख ४१ हजार ४५६ च्या वीजचोºया उघडकीस आल्या.
वीज चोरीच्या गुन्ह्यांसाठी नवे पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:11 PM
वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी विदर्भ परिक्षेत्राकरिता नागपूर येथे एकमेव पोलीस ठाणे होते.
ठळक मुद्देवीज चोरीला बसणार आळा