गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास येथील जीवनरक्षा हॉस्पिटलच्या मागे शेताच्या बांधीतून नवजात शिशूच्या रडण्याचा आवाज आला. काही व्यक्ती त्या आवाजाच्या दिशेने गेले असता बांधीत एक नवजात शिशू असल्याचे दिसून आले. लागलीच या व्यक्तींनी पोलिसांना माहिती देऊन या नवजात शिशूस येथील एका मुलांच्या दवाखान्यात उपचारासाठी हलविले.
डॉक्टरांनीही या शिशूवर तातडीने उपचार केले. या बाळाची प्रकृती आता बरी आहे. सदर बाळ एक ते दोन दिवसांचे असावे, असा असा अंदाज आहे. बदनामीच्या भीतीने महिलेने सदर शिशूस असे उघड्यावर ठेवले व ती पसार झाली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रफुल्ल राखडे यांच्या फिर्यादीवरून नागभीड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंविच्या कलम ३१७ अन्वये गुन्हा दाखल केला असून नागभीड पोलीस त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.