लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यभरातील शासकीय कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. मंगळवारीही सर्व तालुक्यातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शासकीय कर्मचारी संपावर असल्याने दुसऱ्या दिवशीही शासकीय यंत्रणाच ठप्प झाल्याचे चित्र तहसील कार्यालय, पंचायत समीती कार्यालयात दिसून आले. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. तर काही ठिकाणी अधिकारी खुर्चीत बसल्याचे दिसून आले.या संपाचा सर्वाधिक फटका आरोग्य व शिक्षण क्षेत्रास बसला आहे. संपामध्ये आरोग्य विभागाचे चिमूर तालुक्यातील ८६ पैकी ७२ कर्मचारी सहभागी झाले होते. याचा मोठा परिणाम रुग्णांना सहन करावा लागला. पंचायत समिती अंतर्गत येणारे ७८० पैकी ४९६ कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय व तालुक्यातील इतर शासकीय कार्यालयात येणाºया सर्व सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागला.या संपात शिक्षकाच्या विविध संघटनांचे ९५ टक्के शिक्षक सहभागी झाल्याने दुसºया दिवशीे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद होत्या.शिक्षक व इतर कर्मचारी संघटनाच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.शाळा पडल्या ओसकर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक शिक्षकच आलेच नाही. त्यामुळे आज संपाच्या दुसºया दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षकाविनाच काही वेळ काढावा लागला. तर अनेक शाळात विद्यार्थी नसल्याने नेहमी गजबजलेल्या शाळा ओस पडल्या होत्या.आरोग्य सेवा कोलमडलीचिमूर तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील ७२ कर्मचारी तथा उपजिल्हा रूग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात गेल्याने रूग्णालयात आंतर व बाह्यरूग्ण विभागात शुकशुकाट होता. तर आलेल्या रूग्णांना उपचाराविनाच परत जावे लागले.
दुसऱ्या दिवशीही शासकीय यंत्रणा ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:41 PM
राज्यभरातील शासकीय कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. मंगळवारीही सर्व तालुक्यातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शासकीय कर्मचारी संपावर असल्याने दुसऱ्या दिवशीही शासकीय यंत्रणाच ठप्प झाल्याचे चित्र तहसील कार्यालय, पंचायत समीती कार्यालयात दिसून आले. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता.
ठळक मुद्देराज्य कर्मचाऱ्यांचा संप : आरोग्यसेवा, शिक्षण क्षेत्रावर परिणाम