घुग्घुस : गस्ती दरम्यान एका कारमधून एक लाख ५४ हजार ४०० रुपयांची देशी दारू, आठ लाखांची कार व एक दहा हजारांचा मोबाइल, असा एकूण ९ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल घुग्घुस पोलिसांकडून जप्त करण्यात आला. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई बेलोरा एसएसटी पाईंटवर करण्यात आली. आदर्श बंडू पाटील (रा. कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सोमवारी सायंकाळी घुग्घुस पोलीस गस्तीवर असताना दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. वर्धा नदीच्या बेलोरा एसएसटी पाईंटवर नाकेबंदी करून संशयास्पद स्थितीत येत असलेल्या (एम.एच. ३१ एफई ९४६२) या वाहनाला अडवून झडती घेतली असता त्यात दारूची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले.