गणेश विजु भानारकर रा. गांधीनगर ब्रम्हपुरी असे मृत मुलाचे नाव आहे. गणेश हा आपल्या वाॅर्डात राहणाऱ्या काही मुलांसोबत घरापासून सुमारे एक कि.मी. अंतरावरील शहरानजीकच्या वन विभाग कार्यालयासमोरील गिट्टी खदान परिसरात खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याठिकाणी असलेल्या मोठमोठ्या खडड्यांमध्ये पाणी साचले असल्याने तो अंघोळीसाठी म्हणून खड्डयात उतरला. अचानक तो पाण्यात बुडाला. सोबत असलेली मुले घाबरून घराच्या दिशेने पळून गेली. सायंकाळ होऊनही गणेश घरी न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी परिसरात शोधाशोध केली. परंतु गणेशचा पत्ता लागला नाही. त्यानंतर त्याच्यासोबत राहणाऱ्या मुलांना विचारणा केली असता, त्यांनी घडलेली हकिकत सांगितली. रात्री १० वाजता वाॅर्डातील काही लोकांसोबत आई-वडील गिट्टीखदान परिसरात गेले. याची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांनासुध्दा देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांच्या मदतीने पाण्यात गणेशचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.
ब्रम्हपुरीतील नऊवर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:18 AM