शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

निर्मलग्राम, तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

By admin | Published: December 29, 2014 1:11 AM

गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. परंतु, खऱ्या अर्थाने ही यशस्वीता कागदोपत्रीच दिसून येते.

कोरपना : गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. परंतु, खऱ्या अर्थाने ही यशस्वीता कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली त्याच गावात हाणामाऱ्या होत असून निर्मल ग्राम झालेल्या गावातच चोरटी दारु विक्री केली जात आहे. त्यामुळे पुरस्काराचे महत्व सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र दिसून येते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध अभियानाच्या माध्यमातून शासन ग्रामीण भागातील गावागावात शांतता, स्वच्छता व व्यसनाधिनता दूर करण्याचा प्रयत्न व्यावसायिकतेच्या स्वरूपात स्वीकारल्याचे दिसून येते. तंटामुक्तीचा पुरस्कार असो किंवा निर्मलग्रामचा पुरस्कार असो, गावांना प्राप्त झाल्यानंतर गावातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी त्या समस्यांकडे लक्ष दिलेले दिसून येत नाही. कोणत्याही समस्यांचे उच्चाटन करण्यासाठी शासनाकडून नेहमीच प्रयत्न केला जाते. मात्र ज्यावेळी कोणतीही योजना किंवा अभियान गावपातळीवर राबविण्यात येते त्यावेळी त्या योजनेकडे व अभियानाकडे पाहण्याचा हेतू बदलतो. अभियानात सहभागी व्हायचं आणि पुरस्कार मिळवायचा, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले जाते. अधिकारी गावात येणाच्या दिवशी गावात स्वच्छता करून अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी गावकरी जमा होतात. संपूर्ण गावाला नववधू सारखे सजविले जाते. मात्र ती खरी वास्तविकता नसते. लाखो रुपयांचे पुरस्कार मिळवायचे आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशी अवस्था अनुभवायास मिळते. पुरस्काराचे पवित्र्य जपन्यासाठी ज्या गावाना निर्मलग्रामचे असो किंवा तंटामुक्तीचे पुरस्कार मिळाले आहे. त्या गावात केरकचरा जमा होऊ नये, गावात तंटे निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्नरत राहीले पाहिजे. मात्र याच्या उलट परिस्थिती दिसते. निर्मलग्राम झालेल्या गावात कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेली गटारे दिसतात. तर तंटामुक्त झालेल्या गावात तंटे त्याच बरोबर दारुबंदी झालेल्या गावात पुन्हा चोरटी दारु विक्री आदी प्रकार दिसून येत आहेत. काही मुठभर लोकांमुळे अनेक गावाना मिळालेल्या पुरस्काराला कलंक लागला आहे. (शहर प्रतिनिधी)