सिंदेवाही : शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे लागून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रत्येक तरुणाचा प्रयत्न असतो. परंतु सिंदेवाही येथील निशांत नीलकंठ भरडकर याने नोकरी सोडून स्वतःचे नर्सरी केंद्र सुरू करून एक नवीन आदर्श तरुण पिढीसमोर निर्माण केलेला आहे.
निशांत यांनी आपल्या शेतामध्ये तालुक्यातील एकमेव नर्सरी सुरू केलेली आहे. या नर्सरीच्या माध्यमातून भाजीपाला व शोभेच्या रोपांची लागवड त्यांनी सुरू केली आहे. वेगवेगळे प्रयोग करून अनेक प्रकारच्या रोपांची निर्मिती त्यांनी केली असून, सिंदेवाही नगरातील अनेक लोक या नर्सरी केंद्राला भेट देत आहे. दर्जेदार रोपे देण्यासोबतच शेतकरी लोकांना मार्गदर्शन करण्याचा काम निशांत करीत आहे. शेतामधूनसुद्धा रोजगार उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतो, असे निशांतचे मत आहे.