लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना व्हायरचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळी ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंदीचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. आता ही प्रवेशबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे राज्यातील अन्य पर्यटन क्षेत्रासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी सफारी बुक करणाऱ्या पर्यटकांना पुन्हा वाट पहावी लागणार आहे.कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव तसेच व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने तसेच अभयारण्यात देशातील विविध भागातून येणारे देशी पर्यटक व विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेटी देत असतात. त्यांच्या संपर्कात येणारे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता लक्षात घेता ३१ मार्चपर्यंत राज्यातील पर्यटन बंद ठेवण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्य वनजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सोमवारी काढले होते. यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचाही समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या प्रादूभार्वामुळे ताडोबामध्ये येणाºया पर्यटकांची संख्या रोडावत होती. अशातच जिल्हा प्रशासनानेही ताडोबा येणाºया पर्यटकांचे थर्मलस्कॅनिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु राज्यात कोरोना व्हायकसचा प्रसार वाढत असल्यामुळे अखेर राज्यासह ताडोबा पर्यटनही ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले होते. नव्याने आलेल्या सूचनांनुसार राज्यातील सर्व पर्यटन क्षेत्रे ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याबाबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी ‘लोकमत’ला दुजोरा दिला.
Corona Virus in Chandrapur; आता ३० एप्रिलपर्यंत ताडोबा प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 7:07 PM