जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख घसरणीला लागला आहे. परंतु, कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिस नावाचा आजार होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड दहशत पसरली. म्युकरमायकोसिस बाधित ५० पेक्षा जास्त रुग्ण शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मेडिकल स्टोअर्समध्ये म्युकरमायकोसिसवरील एम्पोटीसिरीन-बी इंजेक्शन व पॉसॅकोनाझोल गोळ्या उपलब्ध नाहीत. गत आठवड्यात लिपोसोमल एम्पोटीसिरीन-बी औषध काही मेडिकल स्टोअर्समध्ये मिळत होते. रुग्णसंख्या वाढल्याने मागणी वाढली. त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांचे कुटुंबीय औषधीसाठी चंद्रपुरातील सर्व मेडिकल स्टोअर्सचे उंबरठे झिजवित आहेत. म्युकरमायकोसिस झालेल्या गरीब रुग्णांवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार केला जात असला तरी इंजेक्शनअभावी रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
केवळ ९० इंजेक्शन शिल्लक
चंद्रपुरात म्युकरमायकोसिसचे ५२ रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु, बुधवारी केवळ ९० इंजेक्शन शिल्लक होते. एका रुग्णाला... इंजेक्शन द्यावे लागतात. त्यामुळे रूग्णांच्या कुटुंबांची काळजी वाढली आहे.
इंजेक्शनवर प्रशासनाचे नियंत्रण
म्युकरमायकोसिसवरील तुटवडा लक्षात घेऊन वितरणाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर प्रारंभी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाला होता. नागरिकांच्या तक्रारी होताच प्रशासन सावध झाले. सध्या रेमडेसिविरचा तुटवडा नाही. मात्र, म्युकरमायकोसिसवरील औषधांअभावी मोठे संकट उद्भवले आहे.