अपवादानेच कुठे मास्क लावलेला दिसतो. बाकी सारा आनंदच आहे. एवढेही कोणी माणूस मास्क लावून फिरताना दिसला तर त्यांना काही जण नवलाने बघतात. कोरोनाकाळात माक्स लावणे अत्यंत गरजेचे ठेवण्यात आले होते. शासनाने याबाबत कडक धोरण अवलंबले होते. लोकांनी ही बाब गंभीरतेने घेतली होती. शासकीय कार्यालयात खासगी आस्थापना बँक व इतर कार्यामध्ये माक्स न घातलेल्यांना प्रवेशावर बंदी लावून प्रवेश द्वारावरच ‘नो मार्क्स नो एंट्री ’असे बोर्ड लावून यांची अंमलबजावणीही कडकपणे करण्यात आली होती. कोरोनाची लाट उतरल्यानंतर मात्र ‘नो माक्स, नो एंट्री’ आता नावाची ठरली आहे. कुठेही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कोरोनाबाधिताची संख्या परत वाढत आहे .म्हणून सुरक्षिततेचा उपाय म्हणून माक्स लावणे खरेच अत्यंत गरजेचे आहे.
‘नो मास्क, नो एन्ट्री’ फक्त नावाचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:32 AM