चंद्रपूर : गणेशोत्सवाची चाहुल लागल्यापासूनच बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त तयारीला लागतात. घरगुती गणेशासाठी घरातील मंडळी आपापल्यापरीने कामात व्यस्त होतात, तर सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात येणाºया गणपतीसाठी गणेश मंडळांची धडपड सुरू होते. मात्र या गणेशोत्सवाचे स्वरूप नेमके कसे असावे, याबद्दल चंद्रपूरकरांच्या मनातला गणेशोत्सव नेमका कसा आहे. हे ‘लोकमत’ने एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निरर्थक खर्च टाळणारा, ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण नसणारा, डि.जे. फटाक्याचा अनावश्यक वापर टाळणारा, वीज चोरी, निरर्थक सिनेगीत व मद्यप्राशन नृत्यात न रंगणारा मात्र धार्मिकस्वरुपाचा असला तरी तो पर्यावरणपूरक आणि एकोपा वाढविणारा असावा, असे प्रतिबिंब उमटले.‘आपल्या कल्पनेतील सार्वजनिक गणेशोत्सव’ या विषयावर ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले. यामध्ये शहरातील विविध स्तरातील मंडळींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. महत्त्वाचे आठ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापुढे प्रत्येकी तीन पर्याय देण्यात आले होते. आपल्याला नेमका कसा गणेशोत्सव हवा आहे. याचे प्रतिबिंब या सर्वेक्षणातून उमटले.
निरर्थक खर्च नको; धार्मिक स्वरूपासह एकोपाही हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:57 PM
गणेशोत्सवाची चाहुल लागल्यापासूनच बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त तयारीला लागतात. घरगुती गणेशासाठी घरातील मंडळी आपापल्यापरीने कामात व्यस्त होतात, .....
ठळक मुद्देचंद्रपूरकरांचा सूर : एक गाव एक कल्पनेलाही अनेकांची पसंती, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा लोकमत न्यूज नेटवर्क