शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

अन्य जिल्ह्यातून कुणालाही प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 5:00 AM

जिल्ह्याचा सीमावर्ती भाग सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनीदेखील आपल्या गावात कोणी अनोळखी व्यक्ती व आजारी व्यक्ती दिसला तर त्याची माहिती शासकीय यंत्रणेला द्यावी. सोबतच जिल्ह्यात कोणाची उपासमार होणार नाही. यासाठी अल्पदरात धान्याचे वितरण तसेच शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे सक्त निर्देश : धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव घरातच साजरे करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात, राज्यात व लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत आहे. अशा जिल्ह्यांमधून कुणालाही प्रवेश मिळणार नाही. पोलीस व प्रशासनाची परवानगी असल्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अन्य कोणत्याही जिल्ह्यातून व राज्यातून प्रवेश करता येणार नाही. तसेच चंद्रपूरच्या नागरिकांना जाता येणार नाही. येणाऱ्या काळात सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम रद्द करावे. अजयपूर येथे अशा कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या पोलीस पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज दिली.चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधताना त्यांनी शनिवारी अजयपूर येथे झालेल्या घटनाक्रमाबद्दल खेद व्यक्त केला. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांचे, सण उत्सवांचे आयोजन आपल्या स्वत:साठी व आपल्या परिवारासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने चंद्रपूर शहर किंवा जिल्ह्यातील कोणत्याही गावात कोणीही कार्यक्रम आयोजित करण्याचे धाडस दाखवत असेल तर याबाबत वेगवेगळ्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर माहिती द्यावी. सध्या चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त आहे. पुढील काळात कोणतीही घुसखोरी होणार नाही. अन्यथा जिल्ह्यातील नागरिकांना विनाकारण त्याची किंमत चुकवावी लागेल, चुकीच्या पद्धतीने वागू नये, असे विनम्र आवाहन त्यांनी केले आहे.जिल्ह्याचा सीमावर्ती भाग सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनीदेखील आपल्या गावात कोणी अनोळखी व्यक्ती व आजारी व्यक्ती दिसला तर त्याची माहिती शासकीय यंत्रणेला द्यावी. सोबतच जिल्ह्यात कोणाची उपासमार होणार नाही. यासाठी अल्पदरात धान्याचे वितरण तसेच शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. पुढील ३० तारखेपर्यंत आपल्या घरातील कोणीच बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घरातील ज्येष्ठांनीदेखील घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.३२ पैकी २९ नमुने निगेटिव्हआरोग्य विभागाकडून आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. ४० नव्या नागरिकांची नोंद घेण्यात आली. त्यापैकी ३२ नागरिकांचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी २९ नमुने निगेटिव्ह आले आहे. तीन नमुन्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. जिल्ह्यात तीन हजार ५११ नागरिक निगराणीखाली आहेत. आतापर्यंत १४ दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २३ हजार ३८१ आहे. ४२ नागरिक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत.विनाकारण फिरणाऱ्या ३५ जणांना अटकजिल्ह्यामध्ये विनाकारण फिरणाऱ्या ३५ लोकांना अटक करण्यात आली असून १२० नागरिकांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २६० वाहने जप्त करण्यात आली असून लॉकडाऊन संपेपर्यंत परवानगीशिवाय रस्त्यावर वाहने चालविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य कोणतीही प्रतिष्ठाने उघडण्यास बंदी कायम असून नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन काळात घरीच रहावे, असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.सर्व वाहनांचे होणार निर्जंतुकीकरणमहानगरपालिकेने काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शहराच्या हद्दीत येणाºया सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातदेखील ही कार्यवाही सुरू केली जाणार आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी व प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. याशिवाय चंद्रपुरात असलेल्या व रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.उपासमार होत असेल तर कळवानागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. क्वारंटाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास ०७१७२-२५३२७५, ०७१७२-२६१२२६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस