शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

घोडाझरीचा ओव्हरफ्लोच नाही; पर्यटकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:24 PM

पूर्व विदर्भातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलावाचा ओव्हर फ्लो यावर्षी मुश्कीलच दिसत आहे.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पूर्व विदर्भातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलावाचा ओव्हर फ्लो यावर्षी मुश्कीलच दिसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून घोडाझरी तलाव ओव्हर फ्लो होत नसल्याने पावसाळी पर्यटकांचा हिरमोड होत आहे, हे विशेष.घोडाझरी तलावाची निर्मिती इंग्रजांनी १९०५ मध्ये केली. तीन बाजूला नैसर्गिक टेकड्या असल्याने एका बाजूला बांध घालून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. या तलावाची निर्मिती करताना परिसरातील शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था हा प्रमुख हेतू त्यावेळी असला तरी हल्ली मात्र सिंचनासोबतच घोडाझरी पर्यटनासाठी अधिक प्रसिद्ध पावले आहे.एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून घोडाझरी पूर्व विदर्भात प्रसिध्द आहे. म्हणूनच नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटक घोडाझरीला वर्षभर येत असतात. पण या पर्यटनापेक्षाही आंनददायी असतो तो घोडाझरी ओव्हरफ्लो झाला की निर्माण होणारा नजारा. समोर विशाल तलाव, तलावाभोवतीची हिरवी गर्द वनराई, आणि सांडव्यावरुन फेसाळत पडणारे पाणी हे दृष्य खरोखचर विलोभनीय असेच असते. आणि या फेसाळलेल्या पाण्यात डुबकी मारून निसर्गाचा आनंद घेण्याची जी मजा असते, ती काही औरच असते.हा योग यापूर्वी अनेकदा आला असला तरी २०१३ नंतर हा योग जुळून आलाच नाही. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे घोडाझरी तलाव ओव्हर फ्लोपर्यंत येत नाही. मागील वर्षी ओव्हर फ्लो होण्याची आशा निर्माण झाली होती. पण शेवटी पुरेसा पाऊस न झाल्याने ही आशा मावळली होती.पावसाबाबत बोलायचे झाल्यास यावर्षी पावसाची मागील वर्षीपेक्षा दयनीय अवस्था आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तलावात बरेच कमी पाणी आहे. दमदार पावसाचे दिवस निघून जात आहेत. त्यामुळे यावर्षीही घोडाझरीचा ओव्हर फ्लो जरा मुश्कीलच दिसत आहे.